बांधकाम मुकादमासह पत्नी, मुलीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST2021-03-22T04:35:34+5:302021-03-22T04:35:34+5:30

साताराः शहरालगत असणाऱ्या प्रतापसिंहनगर येथील एका बांधकाम मुकादमासह त्याची पत्नी आणि मुलगीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्या आणि विटांनी मारहाण केल्याप्रकरणी ...

Wife, daughter beaten with construction lawsuit | बांधकाम मुकादमासह पत्नी, मुलीला मारहाण

बांधकाम मुकादमासह पत्नी, मुलीला मारहाण

साताराः शहरालगत असणाऱ्या प्रतापसिंहनगर येथील एका बांधकाम मुकादमासह त्याची पत्नी आणि मुलगीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्या आणि विटांनी मारहाण केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. राजेंद्र साळवे, प्रवीण साळवे, प्रदीप साळवे आणि सुनीता साळवे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, मनोहर सीताराम साळवे (वय ३८, रा. प्रतापसिंहनगर, ता. सातारा) हे बांधकाम मुकादम आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवार, दि. १९ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास राजेंद्र सीताराम साळवे, प्रवीण राजेंद्र साळवे, प्रदीप राजेंद्र साळवे, सुनीता राजेंद्र साळवे (सर्व रा. प्रतापसिंहनगर, सातारा) या चौघांना उधारीचे पैसे नंतर देतो, असे मनोहर यांनी सांगितले. मात्र, या चौघांनी मनोहर, त्यांची पत्नी निर्मला, मुलगी शिवानी या तिघांना प्रतापसिंहनगर येथील राहत्या घरासमोर शिवीगाळ केली. यावेळी लाथाबुक्क्या आणि विटांनी मारहाण केली. याप्रकरणी मनोहर यांनी शनिवार, दि. २० रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सातारा शहर पोलीस ठाण्यात या चौघांच्याही विरोधात तक्रार दिल्यानंतर साळवे कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Wife, daughter beaten with construction lawsuit