शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा बनणार ‘वाय-फाय सिटी’!

By admin | Updated: September 11, 2014 23:06 IST

प्रस्ताव मागविला : राज्य पालिका खात्याच्या संचालक मिता राजीवलोचन यांची भेट

सातारा : ‘पालिकेतर्फे शहरात राबविलेले प्रकल्प वाखाणण्याजोगे आहेत. साताऱ्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. यात भर घालण्यासाठी मेट्रो सिटीच्या धर्तीवर सातारा शहरात ‘वाय-फाय’चा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल. तसेच साताऱ्याच्या ‘वाय-फाय सिटी’बाबतचा प्रस्ताव पालिकेने शासनाकडे सादर करावा,’ अशी सूचना महाराष्ट्र नगरपालिका प्रशासनालयाच्या आयुक्त तथा संचालक मिता राजीवलोचन यांनी केली. मिता राजीवलोचन यांनी आज, गुरुवारी सातारा पालिकेला भेट दिली. दुपारी १२ वाजता त्यांनी कमिटी हॉलमध्ये बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, नगराध्यक्ष सचिन सारस, उपनगराध्यक्षा दिनाज शेख, मुख्याधिकारी अभिजित बापट, नगरसेवक अविनाश कदम, अ‍ॅड. दत्ता बनकर, सुजाता राजेमहाडिक, विजय बडेकर, अमोल मोहिते, कल्याण राक्षे, भाग्यवंत कुंभार, आदी उपस्थित होते.सातारा शहरात पालिकेच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले, भाजी व फ्रूट मार्केटचा प्रश्न मार्गी लावण्यात आला, मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तळी बांधली, आदी उपक्रमांचे राजीवलोचन यांनी कौतुक केले. या बैठकीत नगरसेवक अविनाश कदम यांनी साताऱ्याला ‘वाय-फाय सिटी’ बनविण्याच्या अनुषंगाने शासनाची मदत मिळावी, अशी मागणी केली. शहरात इंटरनेट युजर्स आहेत. मात्र, स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने शहरातील सामान्य कुटुंबातील मुलांसाठीही विनामूल्य माहितीचा खजिना उपलब्ध व्हावा, या हेतूने शासनाने साताऱ्यात ‘वाय-फाय सिटी’ करण्याचा प्रकल्प राबवावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर राजीवलोचन यांनी सहमती दर्शविली. सविस्तर प्रस्ताव पालिकेने तयार करावा व तो शासनाकडे सादर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) सुरक्षितता तपासणे महत्त्वाचे : जिल्हाधिकारीमध्य प्रदेशमध्ये ’वाय-फाय’ सिटीचा प्रकल्प राबविण्यात आला आहे. त्याच पद्धतीचे मॉडेल तयार करता येऊ शकते. मात्र, काहीजण पासवर्ड हॅक करून त्याचा गैरवापर करू शकतात. याबाबतची सुरक्षितता तपासणे महत्त्वाचे असल्याची सूचना यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी बैठकीत केली.