Satara Crime: माझ्यासोबत प्रेमाचं नाटक का केलंस; जाब विचारत तरुणीचा विनयभंग

By दत्ता यादव | Updated: August 22, 2023 15:58 IST2023-08-22T15:58:11+5:302023-08-22T15:58:55+5:30

इन्स्टाग्रामवरून त्यांची मैत्री वाढत गेली

Why did you play love with me; Molesting a young woman in satara | Satara Crime: माझ्यासोबत प्रेमाचं नाटक का केलंस; जाब विचारत तरुणीचा विनयभंग

Satara Crime: माझ्यासोबत प्रेमाचं नाटक का केलंस; जाब विचारत तरुणीचा विनयभंग

सातारा : काॅलेजला जाता-येता तसेच इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मित्राने वाटेत अडवून महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याची घटना साताऱ्यात घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात पुणे जिल्ह्यातील एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

जय सुदाम दंडवते (रा. वाघोली, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित तरुणी २० वर्षांची असून, ती पुणे जिल्ह्यातील रहिवाशी आहे. शिक्षणाच्या निमित्ताने ती साताऱ्यात वास्तव्य करत आहे. मैत्रिणीसोबत काॅलेजला येता-जाता संशयित जय दंडवतेची तिची ओळख झाली. त्यानंतर इन्स्टाग्रामवरून त्यांची मैत्री वाढत गेली. मात्र, दोघांमध्ये भांडणे झाल्यानंतर मारहाण करीत असल्यामुळे पीडित तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले. 

तरी सुद्धा जय दंडवते हा तिचा सतत पाठलाग करत होता. माझ्या सोबत प्रेमाचे नाटक कशाला केलेस, असं म्हणून तिला अश्लील शिवीगाळ केली. तसेच तिच्या अंगावर धावून गेला. एवढेच नव्हे तर तिच्या सोबत असलेल्या मैत्रिणीलाही त्याने शिवीगाळ केली. हा प्रकार असाह्य झाल्याने पीडित मुलीने तिच्या आई-वडिलांना याची माहिती दिली. त्यानंतर सोमवार, दि. २१ रोजी रात्री सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. हवालदार वाघमारे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Why did you play love with me; Molesting a young woman in satara