डोंगर उतारावर ‘श्वेतकरणा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:35 IST2019-04-29T22:35:24+5:302019-04-29T22:35:29+5:30
पेट्री : सातारा जिल्ह्यातील पाटण ते महाबळेश्वर अशा सह्याद्र्रीच्या डोंगर उतारावर समुद्र्रसपाटीपासून ८०० मीटर उंचीचा जंगल भाग आहे. या ...

डोंगर उतारावर ‘श्वेतकरणा’
पेट्री : सातारा जिल्ह्यातील पाटण ते महाबळेश्वर अशा सह्याद्र्रीच्या डोंगर उतारावर समुद्र्रसपाटीपासून ८०० मीटर उंचीचा जंगल भाग आहे. या जंगल भागात श्वेतकरणा वनस्पतीच्या नावाची दुर्मीळ प्रजात दरवर्षीप्रमाणे यंदाही एप्रिल महिन्यात दर्शन देताना दिसत आहेत. या वनस्पतीला पांढऱ्या रंगाची पाच ते सहा फुले आली आहेत. बहुतांशी ठिकाणी अशा प्रकारची फुले फुललेली पाहावयास मिळत आहेत. याला शास्त्रीय नाव क्रायनम ब्रिचिनिमा असे आहे.
कानातल्या फुलाप्रमाणे याचा आकार असून, बटाट्यासारखा जमिनीत गोल कंद असतो. या वनस्पतीला साधारण पाच-सहा पांढरी फुले येऊन ती वाकलेली असतात. या वनस्पतीची फुले कीटक तसेच फुलपाखरांना आकर्षित करतात. कीटके, फुलपाखरे उन्हामुळे तसेच पाण्यासाठी इतरत्र भरकटत असतात. सकाळी मकरंदासारखं एखाद्या किंवा दवबिंदूसारखे या फुलाला लव सुटत असते. त्यामुळे छोट्या चिमण्या, मधमाशी, फुलपाखरे, कीटकदेखील याकडे आकर्षित होतात.
सह्याद्री पठाराच्या डोंगर उतारावर फुलपाखरे, कीटक बाहेर कोठे जाऊ नये, त्यांचा अधिवास याच ठिकाणी कायम राहावा, या हेतूने एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात ही श्वेतकरणा नावाची फुले येतात.
सध्या ही फुले सह्याद्र्रीच्या पठारावर ठिकठिकाणी आली
असून, पर्यटकांचे लक्ष वेधू लागली आहेत. बहुतांशी पर्यटक या
फुलांचे फोटोसेशन करताना दिसत आहेत.
सह्याद्री पठारावर समुद्र्रसपाटीपासून आठशे मीटर उंचीच्या पुढील भागात कीटकांना, फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी निसर्गाची सुरुवात झाली आहे. या फुलांना कर्णफूल म्हणून ओळखले जाते. तसेच ठिकठिकाणी फुललेल्या या फुलांचा हंगाम साधारण महिनाभर असतो.
- श्रीरंग शिंदे, वनपाल, मेढा