शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

जन्मलेल्या कन्येचे दवाखान्यातून वाजत स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:27 PM

मुलगी झाल्याचे समजले तरी अनेकांच्या कपाळावर आट्या पडतात; पण सातारा जिल्ह्यातील क्रांतिकारी चळवळीला साजेसे कार्य लोणंदमध्ये पार पडले.

सातारा : मुलगी झाल्याचे समजले तरी अनेकांच्या कपाळावर आट्या पडतात; पण सातारा जिल्ह्यातील क्रांतिकारी चळवळीला साजेसे कार्य लोणंदमध्ये पार पडले. येथील हॉटेल व्यावसायिक सूरज कुचेकर यांना कन्यारत्न प्राप्त झाले. वाजत-गाजत, मिरवणूक काढून तिला घरी नेण्यात आले. यावेळी मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.

मुलींच्या जन्मदरात घट होत आहे. मुलांच्या तुलनेत होणारी घट चिंताजनक बाब मानली जाते. लोणंदमध्ये मुलगी जन्माला आली आणि त्यांनी मुलीच्या आनंदापोटी गावातून ढोलताशाच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक काढली. पन्नास किलो मिठाई व साखर वाटण्यात आली. लोणंद शहरात असणाऱ्या देवीदेवतांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. त्यामुळे मुलीच्या जन्माचे असे अनोखे स्वागत केल्याने नवा आदर्श समाजासमोर ठेवण्यात आलाय.

स्त्री भ्रूणहत्येच्या घटना घडत असताना लोणंद येथील कुचेकर कुटुंबाने मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव वाजत-गाजत मिरवणूक काढून साजरा केला. लोणंद शहराच्या विविध भागांमध्ये संध्याकाळीच्या वाजत-गाजत मिरवणूक काढली.त्यावेळी गणेश कुचेकर, उत्तम कुचेकर, बाळासाहेब भांड, रघूनाथ शेळके, गिरीश रावळ, मिलिंद घोडके, व्यंकटेश हैब्बारा, जयेश शहा, नीरज कुचेकर, पंकज खंडारे, मेहुल ढवळे, तुषार गवळी उपस्थित होते.

मुलगा-मुलगी हा भेदभाव नष्ट करण्यासाठी या आणि अशाच काही मार्गाचा अवलंब करायला पाहिजे, असं राहून-राहून वाटतं होतं. मुलगाच पाहिजे, ही धारणा समाजातून जात नाही. मुलगा वंशाचा दिवा आहे, तर मुलगी वंशाची प्राणज्योत आहे.मुलगा आणि मुलगी असा भेद भाव करू नये. मुलगा-मुलगी समान असून, समाजाने मानसिकता बदलली पाहिजे, यासाठी आम्ही तिचे ढोल-ताशा लावून स्वागत केले, अशा भावना प्रियल कुचेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.