लोकमतच्या वृत्तानंतर समायोजन तत्वावर पाणी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 17:53 IST2019-01-19T17:51:51+5:302019-01-19T17:53:39+5:30
सातारा : वीज बिलापोटी थकलेली जवळपास ४८ लाख रक्कम न भरल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सातारा येथील कृष्णानगर परिसरात असलेल्या ...

लोकमतच्या वृत्तानंतर समायोजन तत्वावर पाणी पुरवठा
सातारा : वीज बिलापोटी थकलेली जवळपास ४८ लाख रक्कम न भरल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सातारा येथील कृष्णानगर परिसरात असलेल्या जलसंपदा विभागाच्या कर्मचारी वसाहतीतील खंडीत केलेला पाणीपुरवठा शुक्रवारी समायोजन तत्त्वावर पुन्हा पूर्ववत करण्यात आला.
पाणी बिलापोटी थकलेली जवळपास ४८ लाख रुपये रक्कम न भरल्याने साताऱ्यातील कृष्णानगर येथील जलसंपदा विभागातील कर्मचारी वसाहतीचा पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने खंडित केला होता. कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जलसंपदा विभागाने टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात होता. परंतु त्यामुळे या ठिकाणावरील महिलांची गैरसोय होत होती.
याबाबत लोकमतने आवाज उठवून महिलांची गैरसोय मांडली होती. याची दखल घेत संबंधित विभागांनी समायोजन तत्वावर या ठिकाणचा पाणी पुरवठा पूर्वावत केला आहे. या ठिकाणच्या महिलांची गैरसोय लक्षात घेऊन लोकमतने वृत्त प्रसारित केल्याने येथील पाणीपुरवठा पूर्ववत झाला.
- कविता मोरे
काय आहे समायोजन.
बिलापोटी जलसंपदा विभागाकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला ४८ लाख येणे असले तरी मुळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून संबंधित जलसंपदा विभागाला पाणी बिलापोटी ११३ कोटी येणे आहे. त्याच रकमेतून समायोजन करण्याचे ठरले असल्याची माहिती संबंधित विभागाकडून सांगण्यात आले आहे.