शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड-विटा रस्त्यावर पहिल्याच पावसात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 14:43 IST

Rain Satara : सैदापूर हद्दीत असणारा कराड-विटा रस्ता हा मागील काही वर्षांत पावसाळ्यात खूप अडचणीचा ठरत आहे. पावसाळ्यात याठिकाणी पाणी भरते आणि रहिवाशांना आणि दुकानदारांना मोठ्या गैरसोईचा सामना करावा लागतो. पूर्वी पावसाळ्याच्या शेवटी येथे पाणी साठत होते. नंतर मोठा आणि सलग पाऊस आला की पाणी साठू लागले.

ठळक मुद्देकऱ्हाड-विटा रस्त्यावर पहिल्याच पावसात पाणीजन्माची कमाई पाण्यात गेली

ओगलेवाडी : सैदापूर हद्दीत असणारा कराड-विटा रस्ता हा मागील काही वर्षांत पावसाळ्यात खूप अडचणीचा ठरत आहे. पावसाळ्यात याठिकाणी पाणी भरते आणि रहिवाशांना आणि दुकानदारांना मोठ्या गैरसोईचा सामना करावा लागतो. पूर्वी पावसाळ्याच्या शेवटी येथे पाणी साठत होते. नंतर मोठा आणि सलग पाऊस आला की पाणी साठू लागले.

आता तर पाऊस पडला की, रात्रीत पाणी साठायला लागले आहे. परिसरात अनेक बांधकामे होत असून काही लोकांनी नैसर्गिकरीत्या पाणी वाहून जाणारे नाले अडवले आहेत. याबाबत सर्व जण बोलतात; परंतू कारवाई मात्र शून्य असते. पावसाळ्यात हा विषय ऐरणीवर येतो. पावसाळा संपला की पुन्हा थंड पडतो. त्यामुळे याची आता सवय झाली आहे, असेच झाले आहे. या परिसरात सिमेंटचे रस्ते करण्याचे काम सुरू आहे. मात्र, या ठिकाणी येऊन काम बंद पडले आहे.

पाइपलाइन करून पाणी बाहेर काढून देण्यासाठी सुरू झालेले कामही आता बंद आहे. त्यामुळे या वर्षीही पावसाळ्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. आंदोलने आणि निवेदने खूप झाली. मात्र, समस्या सुटली नाही. आता तर ती वाढली आहे, कारण पहिल्याच पावसात पाणी साठायला सुरुवात झाली आहे. प्रशासनाने तातडीने या परिसरातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.जन्माची कमाई पाण्यात गेलीअनेकांनी शालेय परिसर असल्याने येथे निवासी सदनिका घेतल्या. आपली जन्मभराची कमाई घरे घेण्यासाठी खर्च केली. आता येथे पाणी साठायला लागले असल्याने पावसाळा आला की रात्री जागून काढाव्या लागत असल्याने जन्माची कमाई पाण्यात गेली, अशी भावना नागरिकांची झाली आहे.

 

 

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर