बलकवडी कालव्यातून मुळीकवाडी धरणात पाणी, ग्रामस्थांत समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 13:14 IST2019-01-18T13:11:15+5:302019-01-18T13:14:08+5:30
आदर्की-फलटण पश्चिम भागातील चार गावच्या पाणी पुरवठा योजना मुळीकवाडी धरणावर अवलंबून आहे. मुळीकवाडी धरण आटल्याने चार गावच्या पाणी पुरवठा योजना धोक्यात आली होती. संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी बलकवडी कालव्यातून बिबी-मुळीकवाडी ओढ्याला पाणी सोडले. ते पाणी मुळीकवाडी धरणात पोचल्याने जनावरांचा व चार गावच्या पिण्याचा पाणी प्रश्न सुटणार आहे.

बलकवडी कालव्यातून मुळीकवाडी धरणात पाणी, ग्रामस्थांत समाधान
आदर्की : आदर्की-फलटण पश्चिम भागातील चार गावच्या पाणी पुरवठा योजना मुळीकवाडी धरणावर अवलंबून आहे. मुळीकवाडी धरण आटल्याने चार गावच्या पाणी पुरवठा योजना धोक्यात आली होती. संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी बलकवडी कालव्यातून बिबी-मुळीकवाडी ओढ्याला पाणी सोडले. ते पाणी मुळीकवाडी धरणात पोचल्याने जनावरांचा व चार गावच्या पिण्याचा पाणी प्रश्न सुटणार आहे.
फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात मुळीकवाडी धरण १९७२ मध्ये माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते भुमीपूजन करण्यात आले होते. या धरणावरून नांदल, मुळीकवाडी येथील पोटपाटाने जमीन ओलिताखाली आली होती. काही जमीन उपसा जलसिंचनमुळे ओलिताखाली आली होती.
नांदल, मुळीकवाडी, घाडगेवाडी, सासवड गावात पाणीपुरवठा योजना या धरणावर अवलंबून आहेत. मुळीकवाडी धरण पंधरा दिवसांपूर्वी आटल्याने पाणी पुरवठा योजना धोक्यात आली. यासंबंधी लोकमतने मुळीकवाडी धरण आटले; चार गावच्या पाणी पुरवठा योजना धोक्यात या आशयाचे असे वृत्त प्रसिद्ध केले होते.
या वृत्ताची दखल घेऊन बलकवडी कालव्यातून बीबी मुळीकवाडी ओढ्याला पाणी सोडले. ते बीबी घाडगेवाडी येथील बंधारे भरून पाणी मुळीकवाडी धरणात पोहोचले आहे. आता पाणी साठा होऊ लागल्याने चारपाच गावांच्या जनावरांचा पाणी प्रश्न मिटणार आहे. तीस ते चाळीस टक्के पाणीसाठा झाल्यानंतर चार गावांच्या पाणी पुरवठा योजना पुर्ववत सुरू होवून पाणी प्रश्न मिटणार आहे.