शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

वाईत नागरिकीकरणाला गैरसोयींचा विळखा

By admin | Updated: November 14, 2014 23:18 IST

मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प : सुविधा पुरविताना यंत्रणेवर ताण

वाई : वाई शहर व परिसरामध्ये नागरिकीकरण झापाट्याने वाढत आहे. याचे कारण शहराचे ऐतिहासिक महत्त्व, प्रसिद्ध पर्यटनस्थळ व राहण्यासाठी चांगले वातावरण. यामुळे मुंबई, पुण्यातील नागरिकांची पसंती वाईमध्ये सदनिका घेण्यासाठी आहे़ पण, नागरिकीकरण वाढत चालले आहे तसतसे मूलभूत सुविधा पुरविणा-या यंत्रणावर ताण येत आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे़यशवंतनगर ग्रामपंचायत ही वाई शहरास लागून असल्याने झपाट्याने नागरिकीकरण होत आहे. मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प तयार होत आहेत. त्याप्रमाणात त्यांना मूलभूत सुविधा मिळणे गरजेचे आहे. त्यामध्ये गटार, कच-याचे व्यवस्थापन, पाणीपुरवठा या सुविधा देणे आवश्यक आहे. परंतु यशवंंतनगर येथील सोनजाई देवीरोड मुख्य रस्ता व उपगल्ल्यांमध्ये गटराची व्यवस्था नसल्याने मैला, सांडपाणी खुल्यावर सोडले आहे़ त्यामुळे दूषित पाण्याची डबकी साठल्याने डासांचे प्रमाण वाढल्याने साथीचे आजार होण्याची शक्यता वाढली आहे़ तसेच येथे बांधलेल्या एका इमारतीला व इतर घरांना मैला, सांडपाणी सोडण्यासाठी गटराची सोय नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच मुख्य रस्त्यावर गटराची सोय नसल्याने मैला व सांडपाणी सोडल्याने येथील नजीकच्या शासकीय हातपंपाचे पाणी दूषित झाले आहे. ते पिण्यास अपायकारक आहे़ तसेच मुख्य रस्त्याच्या बाजूने पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गेली असून, त्यामध्ये दूषित पाणी शिरण्याची शक्यता आहे़ वाई-बावधन रोडवर दवाखान्यापुढील बावधनकडे जाताना नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण झाल्यामुळे तेथील पाण्याचा नैसर्गिक प्रवाहाला अटकाव झाल्याने पाणी रस्त्यावर साठत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे़ या प्रश्नाबाबत ग्रामपंचायतीस निवेदन दिले असून, अनेक ग्रामसभेत हा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर ठोस कार्यवाही झाली नाराजी व्यक्त होत आहे़ (प्रतिनिधी) नागरिकांनी अनेकवेळा निवेदने दिली. प्रत्यक्ष अवस्था दाखवण्यात आली; पणग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नाही़ तरी प्रत्यक्ष उपाययोजना करावी़-संपतराव सावंत, नागरिकनागरिकांनी कचरा कोठेही टाकू नये, तसेच दूषित पाण्यांच्या डबक्यांमुळे साथीचे रोगपसरण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका संभवतो़ तेव्हा योग्य उपाययोजना करावी़- अ‍ॅड़ अर्जुन ननावरे, नागरिकग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कचरा संकलनासाठी घंटागाडी सुरू आहे. नागरिकांनी कचरा घंटागाडीत टाकावा, तसेच सोनजाई रोड परिसरातील रहिवासी वस्तीसाठी भुयारी गटार योजना मंजूर करीत आहोत, त्यामुळे तेथील समस्या संपतील. ---महेश सावंत, उपसरपंच यशवंतनगर