जमीन कसण्यासाठी जाताना वाट अडवली, दहाजणांवर गुन्हा दाखल; चिखलीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 18:41 IST2022-05-25T18:39:19+5:302022-05-25T18:41:27+5:30

जमीन कसण्यासाठी जात असताना गावातील संशयितांनी तक्रारदारास ट्रॅक्टर व बैलगाडी घेऊन जाण्यास रोखले.

Waiting for land acquisition, ten charged; Incidents in Chikhali Taluka Satara | जमीन कसण्यासाठी जाताना वाट अडवली, दहाजणांवर गुन्हा दाखल; चिखलीतील घटना

जमीन कसण्यासाठी जाताना वाट अडवली, दहाजणांवर गुन्हा दाखल; चिखलीतील घटना

सातारा : जमीन कसण्यासाठी जाताना वाट अडविल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात चिखली, ता. सातारा येथील दहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

मारुती कृष्णा जाधव, यशाेदा मारूती जाधव, काशिनाथ कृष्णा जाधव, कलाबाई काशिनाथ जाधव, लक्ष्मण कृष्णा जाधव, कल्पना लक्ष्मण जाधव, यशवंत कृष्णा जाधव, बबाबाई यशवंत जाधव, तानाबाई कोंडिबा जाधव, दीपक यशवंत जाधव (सर्व रा. चिखली, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विठोबा रामचंद्र शिर्के (वय ६६, रा. चिखली, ता. सातारा) यांची गावात वडिलोपार्जित जमीन आहे. ही जमीन कसण्यासाठी जात असताना गावातील वरील संशयितांनी त्यांना ट्रॅक्टर व बैलगाडी घेऊन जाण्यास रोखले. या प्रकारानंतर शिर्के यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल केले.

Web Title: Waiting for land acquisition, ten charged; Incidents in Chikhali Taluka Satara