शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

ढेबेवाडीला प्रतीक्षा ‘सभापतीं’ची!

By admin | Updated: July 23, 2014 22:31 IST

आरक्षण : ‘बोनस’ म्हणून परिसराला संधी मिळणार का ?

ढेबेवाडी : पाटण तालुक्याच्या राजकीय क्षेत्रातील सत्ता परिवर्तनाचे शक्तिकेंद्र म्हणून ढेबेवाडी विभागाकडे पाहिले जाते़ या विभागातील प्रत्येक हालचालीवर पाटणकर - देसाई गटांचे बारकाईने लक्ष असते़ आपले राजकीय हाल होऊ नयेत म्हणून दोघेही विकासाबरोबर तालुक्याची महत्त्वाची पदे याच विभागास बहाल करून एकमेकांवर चाल करतात़ सध्या दोन्ही गटांची चेअरमन-सभापती पदे याच विभागात असल्याने कुस्ती बरोबरीत सुटली आहे़; पण आता जाहीर झालेल्या पंचायत समिती सभापती पदाची लॉटरी पाटणकर गटाला लागल्याने हे पद ढेबेवाडी विभागास बोनस म्हणून देऊन आपले पारडे जड करणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत़ निवडणुका आल्या की, ढोल बडवणारे नेते जागे होतात, ही जरी वस्तुस्थिती असली तरी पाटण तालुका याला अपवाद आहे़ या तालुक्यातील नेते निवडणुका असो किंवा नसो. सदैव गळ्यात ढोल बांधून प्रसिध्दीमाध्यमांच्या सहकार्याने तालुकाभर वाजवत असतात़ तालुक्यातील पंचायत समिती, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, शिवदौलत बँक, पाटण अर्बन बँक, साखर कारखाना, आदी महत्त्वपूर्ण सत्तांवर देसाई-पाटणकर गटांचे वर्षानुवर्षे वर्चस्व आहे़ मुख्यमंत्री, सिक्कीमचे राज्यपाल, विधान परिषदेवर आमदार अशा महत्त्वाच्या ठिकाणी याच तालुक्याचे सुपुत्र पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील, नरेंद्र पाटील अशी वरिष्ठ नेतेमंडळी असताना सुद्धा सध्यातरी तालुक्यातील सर्वच सत्तास्थानांपासून दूर ठेवण्यात देसाई-पाटणकर यशस्वी झाल्याचे चित्र दिसत आहे़ तसा विचार केला तर पाटण तालुका ढेबेवाडी, पाटण, कोयनानगर, तारळे आणि मल्हारपेठ अशा पाच विभागांनी जोडला गेला आहे़ यापैकी पाटणमध्ये पाटणकरांचे तर मल्हारपेठ-मरळीमध्ये देसाई गटाचे नेहमीच पारडे जड असते; पण अलीकडे दहा वर्षांपासून ढेबेवाडीचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे़ या विभागातून काँग्रसचे नेते हिंदुराव पाटील यांनी ‘किंगमेकर’ची भूमिका बजावतात अल्पमतात असताना ही दोन्ही गटांना जेरीस आणून देसाई गटाबरोबर युती करून सभापती-उपसभापती पदाचा बाजी मारला तर पाटणकर गटाबरोबर आघाडी करून उपसभापतिपद मिळवले़ या गटा-तटाच्या चढाओढीत मात्र आमदार विक्रमसिंह पाटणकर आणि माजी आमदार शंभूराज देसाई यांनी ढेबेवाडी विभागाला तर प्राधान्य दिलेच, शिवाय पदांचीही खैरात केली़ सध्या देसाई गटाने बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमनपद, पंचायत समितीचे सभापतिपद तर पाटणकर गटाने पाटण अर्बन बँकेचे चेअरमनपद, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापतिपद, याच विभागात देऊन समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे़ आता सभापतिपदाचे आरक्षण जाहीर झाले़ देसाई गटाकडे असा उमेदवार नसल्याने पाटणकर गटालाच ही लॉटरी लागली आहे़ विधानसभेच्या तोंडावर लागलेल्या लॉटरीचे बक्षीस पाटणकर ठेवणार की ढेबेवाडीकडे पाठवणार याकडे नजरा लागल्या आहेत़ (वार्ताहर)