शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
पॅलेस्टिनी समर्थकांसाठी ग्रेटा थनबर्ग रस्त्यावर उतरली अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या; लंडनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!
3
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
4
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
5
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex १०० अंकांनी घसरुन उघडला, Infosys, Wipro टॉप लूझर्स
6
महापालिका निवडणूक: काँग्रेससोबत अकोल्यामध्ये आघाडी करणार का? प्रकाश आंबेडकरांनी मांडली रोखठोक भूमिका
7
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
8
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
9
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
10
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
11
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
12
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
14
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
15
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
16
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
17
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
18
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
19
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
20
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
Daily Top 2Weekly Top 5

भैरेवाडी खूनप्रकरणी ग्रामस्थांचा मल्हारपेठ पोलिस ठाण्यावर मार्चो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 16:57 IST

देसाई याच्या मारेकऱ्याला पोलिसांनी १२ तासाच्या आतच बेड्या ठोकल्या

हणमंत यादवचाफळ : पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील भैरेवाडी (डेरवण) येथील खून प्रकरणाला वेगळे वळण लागू पाहत आहे. यातील मुख्य आरोपी नारायण मोंडे सोबत आणखी मारेकरी असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक केला आहे. घटनेच्या तिसऱ्या दिवशी संतप्त ग्रामस्थांनी मल्हारपेठ पोलिस ठाण्यावर धडक मोर्चा काढत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी निवेदनाव्दारे केली आहे.या निवेदनात म्हटले आहे की, भैरेवाडी येथील वडाप व्यावसाईकाचा सिताराम बबन देसाई (वय ४५) शुक्रवारी (दि ९) मध्यरात्री अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. खूनानंतर संशयिताने पलायन केले होते. घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी सिताफिने सापळा रचून आरोपी नारायण तुकाराम मोंडे (४८) यास गणेवाडी गावच्या जंगलातून अटक केली होती. यावेळी नारायण मोंडे याने चौकशी दरम्यान पत्नी सोबत मयत सिताराम देसाई याचे अनैतिक संबंध असल्याने त्याचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. या घटनेनंतर गावात भितीचे वातावरण पसरले आहे. कारण या खुनात आरोपी मोंडे याच्या सोबत आणखी काही लोकांचा सहभाग असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.सिताराम देसाई याच्या मारेकऱ्याचा पोलिसांनी १२ तासाच्या आतच शोध लावत बेड्या ठोकल्या. त्यामुळे पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. असे असतानाच भैरेवाडीतील संतप्त ग्रामस्थांनी या प्रकरणात आणखी काही मारेकरी सामील असल्याचा संशय व्यक केला आहे. त्यामुळे देसाई यांच्या कुटुंबियांना धोका असल्याने मोकाट गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी गावातील ग्रामस्थ, महिलांची मोठी उपस्थिती होती.

भैरेवाडी खुन खटल्यातील आरोपी नारायण मोंडे याची चौकशी सुरु आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनातील माहिती ग्रहित धरुन तपास सुरु आहे. या प्रकरणात जर कोणी सहभागी असतील तर नक्कीच त्यांच्यावरही कारवाई होईल. - उत्तम भापकर -  सहाय्यक पोलिस निरीक्षक मल्हारपेठ

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस