Vidhan sabha 2019 : विधानसभा की लोकसभा दोन दिवसांत निर्णय - पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 06:14 IST2019-09-30T06:13:36+5:302019-09-30T06:14:21+5:30
लोकसभा की विधानसभा लढवायची याचा निर्णय कºहाडचा मतदार केंद्रस्थानी मानून दोन दिवसांत घेऊ, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

Vidhan sabha 2019 : विधानसभा की लोकसभा दोन दिवसांत निर्णय - पृथ्वीराज चव्हाण
क-हाड (जि.सातारा) : लोकसभा की विधानसभा लढवायची याचा निर्णय कºहाडचा मतदार केंद्रस्थानी मानून दोन दिवसांत घेऊ, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. सध्या देश, पक्ष व लोकशाहीही संकटात आहे. दबावतंत्राने आमिषे दाखवून विरोधकांना संपवायचं षडयंत्र भाजप सरकार करत आहे. अशा हुकूमशाही प्रवृत्तीला हाकलून शेतकऱ्यांचं राज्य टिकवायचं असेल तर प्रीतिसंगमावरूनच क्रांतीची मशाल पेटवा, असे आवाहन त्यांनी केले.
कºहाड येथे कºहाड दक्षिण काँग्रेस समितीच्यावतीने
द्यआयोजित बुथ कमिटी मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या. कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी असा आग्रह धरला.