शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

शर्यत बंदी विरोधात बळीराजा रस्त्यावर

By admin | Updated: January 22, 2017 23:48 IST

कऱ्हाडात निदर्शने : बंदी उठवा अन्यथा तीव्र आंदोलन; बैलगाडी चालक-मालक संघटनेचा इशारा

कऱ्हाड : तामिळनाडू येथे जलीकट्टूला केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर तेथील सरकारने पुन्हा शर्यती सुरू केल्या. मात्र, महाराष्ट्र सरकारने अद्यापही शर्यतींना मंजुरी दिलेली नाही. तसेच शर्यतींना ‘पेटा’ संस्था आणि प्राणीमित्र संघटनांची विरोध केल्यामुळे शर्यतींवर घातलेली बंदी राज्य शासनाने तत्काळ उठवावी, तसेच ‘पेटा’ संस्था व प्राणीमित्र संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणी करीत कऱ्हाड येथे रविवारी अखिल भारतीय बैलगाडी चालक-मालक संघटनेचे राज्याध्यक्ष धनाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने शर्यतीबाबत निर्णय न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविणार असल्याचा शिंदे यांनी यावेळी इशारा दिला.यावेळी पैलवान आनंदराव मोहिते, उदयसिंह पाटील, प्रकाश आळते, अ‍ॅड. जितेंद्र पाटील, युवराज पाटील, बापूराव चव्हाण, गोपीचंद तपासे, राजेंद्र जाधव, संदीप बाबर, हेमंत करांडे, हृषीकेश मोरे आदींसह कऱ्हाड तालुक्यातील बैलगाडी चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.धनाजी शिंदे म्हणाले, ‘तामिळनाडू सरकारने जलीकट्टूच्या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. मात्र, महाराष्ट्रात केंद्र सरकारकडून राज्यातील बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना राज्य शासनाकडून यास प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैलगाडी शर्यती सुरू करण्याच्या निर्णयाला मंजुरी द्यावी, जेणेकरून तामिळनाडूप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही बैलगाडी शर्यती पुन्हा सुरू होतील. २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी व जलीकट्टू या बैलांच्या खेळावरील बंदी कायम केली होती. त्यानंतर पुन्हा जानेवारी २०१६ मध्ये अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या माध्यमातून शिष्टमंडळाने बैलगाड्या चालक, हातगाडीवाले यासह अनेक व्यावसायिकांचा प्रपंच रस्त्यावर आल्यामुळे आता केंद्र व राज्य सरकारने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा व बैलगाडी शर्यती सुरू कराव्यात, अशी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्ली येथे भेट घेत त्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून बैलगाडी शर्यती निश्चित सुरू करण्यात येतील, असे केंद्रीयमंत्री जावडेकर यांनी सांगितले होते. त्यानुसार केंद्रीयमंत्री जावडेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बैलगाड्या शर्यती सुरू करण्याबाबत चर्चा केली. चर्चेमधून पंतप्रधान मोदींनी यास परवानगी दिली. त्यानुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राज्यात पुन्हा बैलगाडी शर्यती सुरू कराव्यात, अशी घोषणा केली. मात्र, त्यावेळी ‘पेटा’ व प्राणीमित्र संघटनेने पुन्हा या निर्णयाला आव्हान दिले. तेव्हा पुन्हा सर्वाेच्च न्यायालयाने शर्यतींना स्थगिती दिली. आता नुकतेच तामिळनाडू येथे झालेल्या आंदोलनानंतर केंद्राने मान्यता दिल्यानंतर तामिळनाडू सरकारने तेथे जलीकट्टू, बैलगाडी शर्यतींना मंजुरी दिली आहे. अशाप्रकारे महाराष्ट्र सरकारनेही राज्यात बैलगाडी शर्यती सुरू करण्यास मंजुरी द्यावी, अन्यथा राज्यभर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येतील.’यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळ व दत्ता चौक येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी आनंदाराव मोहिते, उदयसिंह पाटील, प्रकाश आळते यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलन करण्यापूर्वी संघटनेच्या वतीने शनिवारी प्रशासनास याबाबत निवेदनही देण्यात आले. (प्रतिनिधी)