शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक प्रक्रि येला वेग

By admin | Updated: March 22, 2016 23:30 IST

लासलगाव : बाजार समितीसाठी २७२ इच्छुकांचे अर्ज

 लासलगाव : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आजअखेर २७२ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे.शुक्रवारी व शनिवारी निफाड प्रांत कार्यालयात कर्ज भरण्यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी एकच गर्दी केली होती.बाजार समितीच्या १८ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघाच्या ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यात सर्वसाधारण- सात जागा, महिला राखीव- दोन जागा, इतर मागासवर्गीय- एक जागा, विमुक्त जाती/ भटक्या जमातीसाठी- एक जागा, ग्रामपंचायत मतदारसंघाच्या- चार जागांसाठी अर्ज दाखल झाले असून, सर्वसाधारण दोन जागांसाठी, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीकरिता एक जागा, आर्थिक दुर्बल घटकाकरिता एक जागा, व्यापारी मतदार संघाच्या दोन जागा, तर हमाल-मापारी मतदारसंघाच्या एका जागेकरिता मतदान होणार आहे.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. शशिकांत मंगरूळे काम पाहत आहे. तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार संदीप आहेर हे काम पाहत आहे. वैद्य हे सहायक म्हणून काम पाहत आहे. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांमध्ये माजी आमदार कल्याणराव पाटील तसेच विद्यमान सदस्य नानासाहेब पाटील, जयदत्त होळकर, पंढरीनाथ थोरे, राजेंद्र डोखळे, बाळासाहेब क्षीरसागर, विजय सदाफळ, इंदुमती तासकर, तान्हाजी पूरकर, शिवाजी तासकर, बबन सानप, शिवाजी ढेपले, नंदकुमार डागा, सचिन ब्रम्हेचा, दिलीप गायकवाड, सुभाष कराड, डी. के. जगताप, सुवर्णा जगताप, दत्तात्रय डुकरे, मधुकर गायकर, ज्ञानेश्वर गांगुर्डे, अशोक गवळी, भीमराज काळे, आशिष मोगल, रामकृष्ण दराडे, अनिल क्षीरसागर, विशाल पालवे, सुनील शिंदे, संजय वाकचौरे बाळासाहेब दराडे आदिंचा समावेश आहे.दरम्यान, बाजार समितीच्या निवडणुकीत प्रस्थापितांमुळे नवीन चेहऱ्यांना संधी मिळत नसल्याने वाढणारी इच्छुकांची गर्दी नेत्यांना डोकेदुखी ठरणार आहे. तिसरे पॅनल तयार करण्यात हालचाली गतिमान झाल्या आहेत.समितीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. तिरंगी लढत होण्याचे संकेत प्राप्त होत आहे. लासलगाव बाजार समितीत सध्या माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ कामकाज पाहत आहे. भुजबळ ईडीच्या कारवाईत न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे समर्थक काय करणार, याची चर्चा सुरू आहे.छगन भुजबळ हे कारवाईमुळे प्रत्यक्ष येथे नसले तरी आम्ही भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीस सामोरे जाणार आहोत, असे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर यांनी सांगितले. (वार्ताहर)