शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

बारा वर्षांनंतरही आशा सेविकांची परवड काही संपता संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 3:24 PM

आशा सेविकांना १२ वर्षोच्या तपानंतरही विविध प्रलंबित मागण्यासह दरमहा मिळणाऱ्या मासिक मानधनासाठी शासन दरबारी झगडावे लागत आहे. सुरुवातीला या आशा सेविकांना शासन दरमहा १५० रुपये मानधन व कामाचा मोबदला देत होते.

हणमंत यादवचाफळ: ग्रामीण भागासह शहरी भागात आरोग्य व्यवस्थेचा कणा ठरलेल्या आशा सेविकांना १२ वर्षोच्या तपानंतरही विविध प्रलंबित मागण्यासह दरमहा मिळणाऱ्या मासिक मानधनासाठी शासन दरबारी झगडावे लागत आहे. तोकड्या मानधनावर संसाराचा गाढा हाकणाऱ्या या सावित्रींच्या लेकिंची शासन व शासनकर्त्यांनी केलेली परवड व  व्यथा लोकमतच्या माध्यमातून मांडण्याचा  त्या प्रयत्न करत आहेत.सातारा जिल्हा सावित्रींच्या लेकिंचा जिल्हा म्हणून ओळखला जावू लागला आहे. या सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात शासनाने सन. २००९ साली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अभियानाअंतर्गत आशा सेविकांची पदे भरली आहेत. सुरुवातीला या आशा सेविकांना शासन दरमहा १५० रुपये मानधन व कामाचा मोबदला देत होते. यावेळी कुटुंब प्रमुख १५० रुपयांसाठी आरोग्य विभागात काम करु देत नव्हते. शेवटि सावित्रीच्या लेकिंचा जिल्हा. मागेपुढे आपले काही तरी चांगले होईल या आशेने अनेकींनी आरोग्य सेवेचा वसा जोपासला पन आजही त्यांचा भ्रमनिरास झालेला पाहावयास मिळत आहे.

सुरुवातीला जिल्ह्यातील बऱ्याचशा गावात महिनो अनं महिने आशा सेविकांची पदे रिक्त असायची. तर ज्या ठिकाणी पदे भरली गेली त्यातील बहुतांश सेविकांनी सहा महिन्यांतच आरोग्य विभागाचा निरोप घेतला होता. हि खरी वस्तुस्थिती आहे.आज याच आशासेविका व गटप्रवर्तकांना १२ वर्षेपूर्ण होत आहेत. मात्र त्यांच्या हालअपेष्टा काही संपता संपेणात.  आशासेविका व गटप्रवर्तकांनी वेळोवेळी आशा वर्कस फेडरेशनच्या माध्यमातून राज्यभर आंदोलने, मोर्चे काढून शासन दरबारी विविध मागण्या मांडल्या परंतू यातिल प्रत्यक्षात शासनकर्त्यांच्या आश्वासना नंतर  किती मागण्या पूर्ण झाल्या हा संशोधनाचा विषय ठरला आहे. शासन व शासनकर्त्यांकडून आश्वासनांच्या फैरी झाडल्या गेल्या मात्र प्रत्यक्षात पदरी उपेक्षाच पडली आहे. शासन फक्त अध्यादेश काढत आहे पन निधीची तरतूद करताना उदासीन धोरण राबवत आहे. कोरोना काळातील त्याग लक्षात घेवून प्रशासनाने मासिक मानधन व कामाचा मोबदला यासाठी  निधीची तरतूद करत तो निधी दरमहा वेळेत आशांच्या खात्यावर वर्ग होणे गरजेचे आहे. अशी अपेक्षा सेविकांची आहे.

गेली १२ वर्षोपासुन तुटपुंज्या मानधनावर आम्ही काम करत आहे. शासन वेळेत मोबदला देत नाही. फक्त अध्यादेश काढत आहे पन निधीची तरतूद करताना उदासीन धोरण राबवत आहे. कोरोना काळातील आमचा त्याग लक्षात घेवून प्रशासनाने मासिक मानधन व कामाचा मोबदला यासाठी  निधीची तरतूद करत तो निधी दरमहा वेळेत आशांच्या खात्यावर वर्ग होणे गरजेचे आहे. - अलका वेदफाटक - आशा सेविका, चाफळ.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर