स्वखर्चातून गावामध्येच उभारलाय ‘वाचनकट्टा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 10:14 PM2020-03-01T22:14:09+5:302020-03-01T22:14:23+5:30

अजय जाधव । उंब्रज : ‘वाचाल तर वाचाल’ हे वाक्य आपण कायम शाळेच्या भिंतीवर वाचत आलो आहोत. या वाक्याची ...

'Vachchankatta' has been set up in the village itself. | स्वखर्चातून गावामध्येच उभारलाय ‘वाचनकट्टा’

चोरे, ता. कºहाड येथील ग्रामपंचायत सदस्या स्वाती साळुंखे यांनी गावात उभारलेल्या वाचन कट्ट्यांवरील पुस्तके नागरिक वाचू लागले आहेत.

Next

अजय जाधव ।
उंब्रज : ‘वाचाल तर वाचाल’ हे वाक्य आपण कायम शाळेच्या भिंतीवर वाचत आलो आहोत. या वाक्याची अंमलबजावणी करत ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी. या उद्देशाने कºहाड तालुक्यातील चोरेसारख्या ग्रामीण भागातील स्वाती साळुंखे यांनी पुढाकार घेतलाय. त्यांनी गावातील कट्ट्यावर विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी पुस्तकांचा खुला वाचनकट्टा मोफत सुरू केला आहे.
सर्वत्र तरुणाई मोबाईलच्या आहारी गेलेली दिसून येते. या मोबाईलमधून तरुणाईने बाहेर पडावे, त्यांनी वाचावे, यासाठी चोरे ग्रामपंचायतीच्या सदस्या स्वाती साळुंखे यांनी गावातील जुन्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरील कट्ट्याचे रुपांतर वाचनालयात केले. अन् तो कट्टा आता बनला आहे वाचनकट्टा.
मुलांना, युवकांना व ग्रामस्थांना याठिकाणी बसून वाचन करता येईल, अशी सोय करण्यात आलेली आहे. ही पुस्तके घरी नेऊन वाचायची असतील तर तशीही सोय करण्यात आलेली असून, पुस्तक घरी नेणाऱ्यांनी नोंदवहीत फक्त नाव व मोबाईल नंबर नोंदवणे गरजेचे आहे. त्यांनीच पुस्तक माघारी ठेवताना नोंदवहीत पुस्तक जमा नोंदवून वाचनकट्ट्यावरील पुस्तक ठेवण्याच्या जागी पुस्तक ठेवायचे, अशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेले आहे.
चोरे गावातील जुन्या ग्रामपंचायतीच्या समोरील कट्ट्यावर गावातील तरुण व ग्रामस्थ, तरुण व ग्रामस्थांना बसण्याची जागा होती. एसटी येण्यासाठी प्रतीक्षा करणारे असंख्य महाविद्यालयीन तरुण ग्रामस्थ उभे राहतात. या ठिकाणी पुस्तके ठेवून त्यांना वाचनाची आवड निर्माण करावी, असे सुचले आणि वाचनकट्टा तयार केला.
- स्वाती साळुंखे
ग्रामपंचायत सदस्या, चोरे
स्वाती साळुंखे यांनी उभारलेल्या वाचन कट्ट्याचा उपक्रम स्तुत्य आहे. या कट्ट्यामुळे ऐतिहासिक कादंबरी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची अशी अनेक पुस्तके गावात विनामूल्य उपलब्ध झाली आहेत. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना या अनोख्या अशा वाचनकट्ट्याचा नक्कीच लाभ होणार आहे. तसेच त्यांच्या करिअरसाठी दिशादर्शक ठरेल.
- माधवी गुरव, महाविद्यालयीन युवती, चोरे, ता. कºहाड

Web Title: 'Vachchankatta' has been set up in the village itself.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.