शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उंडाळकरांना पाठिंबा हवा; पण चिन्ह नको!

By admin | Updated: April 28, 2015 23:45 IST

‘डीसीसीत’ही विधानसभेचा ‘फॉर्म्युला’ : राष्ट्रवादीसोबत असूनही उंडाळकरांचं ‘एकला चलो रे’--सांगा डीसीसी कोणाची ?

प्रमोद सुकरे - कऱ्हाड  विधानसभा निवडणुकी पाठोपाठ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँगे्रसने माजी मंत्री विलासराव पाटील - उंडाळकरांना मदतीचा हात देऊ केलाय. कऱ्हाडला विकास सोसायटी मतदार संघातून राष्ट्रवादीने उमेदवारच उभा केलेला नाही; पण उंडाळकरांनी गतवेळीप्रमाणे पाठिंबा घेत चिन्ह मात्र सोयिस्करपणे बाजूला ठेवलंय. तालुक्याच्या राजकारणात याचीच चर्चा आहे.एकेकाळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नेतृत्व करणारे विलासराव पाटील - उंडाळकर यंदा अपक्ष म्हणून कऱ्हाडमधून एकटेच लढत आहेत. राष्ट्रवादीने त्यांना बरोबर घेण्याचीच भूमिका बजावली आहे. त्यामुळे यावेळीही राष्ट्रवादीने त्यांच्या विरोधात उमेदवार देणे सोयिस्करपणे टाळले आहे. पक्षात किंवा पॅनेलमध्ये न येताच ‘राष्ट्रवादी’ उंडाळकरांवर एवढी का मेहरबान आहे, हे कार्यकर्ते समजून घेण्याचा प्रयत्न करताहेत.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने उंडाळकरांऐवजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली. त्यावेळी नाराज उंडाळकरांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर तोंडसुख घेतले. मग काय राष्ट्रवादीनेही उंडाळकरांना थेट आपल्याकडून चव्हाणांविरोधात लढण्याचे निमंत्रण देऊन टाकले; पण उंडाळकरांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. मग उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली; पण पुन्हा ती रद्द करून उंडाळकरांना राष्ट्रवादीने पुरस्कृत केले. मात्र उंडाळकरांनी राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हातात बांधले नाही.जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उंडाळकरांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका सुरूवातीपासून घेतली. तर बंडखोर खासदार उदयनराजे भोसलेही उंडाळकरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे उंडाळकर परिवर्तनाच्या ‘विमानात’ बसणार की राष्ट्रवादीच्या ‘कपबशी’तून मैत्रिपूर्ण चहा पिणार, याची साऱ्यांनाच उत्सुकता होती; पण उंडाळकरांनी हातात चक्क ‘किटली’घेत अपक्ष लढण्यातच धन्यता मानली आहे. राष्ट्रवादीनेही त्यांच्या विरोधात उमेदवारच उभा न करता त्यांना मदत करण्याचाच अप्रत्यक्ष निर्णय घेतला आहे. उंडाळकरांविरोधात आटकेकर पैलवान धनाजी पाटील दोन हात करीत आहेत. ‘पाठिंबा हवा; पण चिन्ह नको’ ही भूमिका उंडाळकरांनी विधानसभेलाही घेतली होती. मात्र, त्याचा फायदा त्यांना झालेचा दिसला नाही. आता जिल्हा बँक निवडणूकीतही उंडाळकर तोच फॉर्म्युला पुन्हा वापरत आहेत.