शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

...तर मराठा आरक्षणासाठी उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे रस्त्यावर उतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 13:02 IST

मराठा आरक्षणाच्याबाबतीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयात सरकारच्यावतीने ताकदीने बाजू मांडली होती. मात्र सध्याचे सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना कमी पडले आहे. राज्य सरकारने तत्काळ ठोस पावले उचलावीत अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.

ठळक मुद्देमराठा आरक्षणाच्याबाबतीत उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे रस्त्यावर उतरणारमराठा आरक्षणात राज्य सरकार कमी पडले!, अद्यादेश काढण्याची मागणी

सातारा : मराठा आरक्षणाच्याबाबतीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयात सरकारच्यावतीने ताकदीने बाजू मांडली होती. मात्र सध्याचे सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना कमी पडले आहे. राज्य सरकारने तत्काळ ठोस पावले उचलावीत अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.खा. उदयनराजे यांनी समाजमाध्यमावर आपले मत व्यक्त केले आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मराठा समाजाच्या प्रत्येक लढ्यात मी त्यांच्यासोबत आहे. समाजाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्नांची शर्थ करु.

या लढ्यात मराठा समाजासोबत मी आहे, हे सरकारने लक्षात ठेवावे. मराठा आरक्षणला स्थगिती दिल्यामुळे समाजाच्या प्रगतीला मोठी खीळ बसली आहे. सरकारने समाजाला विश्वासात घेऊन योग्य ती कार्यवाही केली असती तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते.आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, ह्यमराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली ही बाब दुर्देवी असून समाजासाठी अन्यायकारक आहे. मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज जे पाऊल उचलेल ते सर्वांना मान्य असेल. राज्य सरकारने स्थगिती उठवण्यासाठी लवकर हालचाल करावी, समाजाच्या निर्णयानुसार आरक्षणासाठी प्रसंगी पुन्हा रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयात विधेयक टिकवले. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने आपली बाजू नीट मांडली नाही, असेच म्हणावे लागेल. दरम्यान, सरकारने गांभीर्याने लक्ष घालून आरक्षणावरील स्थगिती उठवली पाहिजे, ही सकल मराठा समाजाची अपेक्षा आहे. मराठा समाज फार मोठा आहे. या समाजातील असंख्य लोक आर्थिक मागास आहेत.

समाजाच्या अनेक अडचणी आहेत. त्यासाठी आरक्षण आवश्यक आहे. त्यामुळे सकल मराठा समाजाचा जो निर्णय होईल तो मान्य करुन प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागले तरी उतरु आणि आंदोलन करु, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे या पत्रकात म्हटले आहे.

जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतीम निकाल येत नाही, तोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या सवलती तसेच नोरकभरतीतले आरक्षण कायम ठेवावे, यासाठी सरकारने तातडीने अद्यादेश काढावा, अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे.- उदयनराजे भोसलेखासदार

 

मराठा समाजाने आरक्षणासाठी लढा उभारला, मोर्चे काढले. एवढं सगळं करुन जर आरक्षणाला स्थगिती मिळत असेल तर खूपच दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे सरकारने स्थगिती उठवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावा.-शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSatara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले