साताऱ्यातील पोवई नाक्यावरील दुकानात इनर्व्हटरचा स्फोट: दोन तरुण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:21 IST2019-07-12T00:19:52+5:302019-07-12T00:21:31+5:30
आगीमुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामन दलाचे जवान आग विझवण्यासाठी प्रयत्न करीत होते.

साताऱ्यातील पोवई नाक्यावरील दुकानात इनर्व्हटरचा स्फोट: दोन तरुण गंभीर जखमी
सातारा : पोवई नाका येथील एका स्टेशनरी दुकानात गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास शॉर्ट सर्किटने इनर्व्हटरचा स्फोट झाल्याने आग लागून दोन तरुण जखमी झाले आहेत. कुणाल कदम (वय २०, रा. कदमभाग सातारा) व जय दगडे (वय २०) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीमुळे दुकानातील साहित्य जळून खाक झाले असून पोवई नाका परिसरात धुराचे लोट तयार झाले होते.
पोवई नाक्यावरील श्री स्टेशनरी येथे गुरुवारी रात्री कुणाल कदम व जय दगडे हे दोघे उशिरापर्र्यत काम करत होते. यावेळी येथील शॉर्ट सर्किटने इनर्व्हटरचा स्फोट झाला. हा स्फोटाने दुकानातील दोघेही दुकानाबाहेर फेकले गेले. स्फोटामुळे दुकानातील साहित्याने पेट घेतला. आगीमुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामन दलाचे जवान आग विझवण्यासाठी प्रयत्न करीत होते.