Satara News: धोंडेवाडीत भरवस्तीत गव्याचा हल्ला, दोघे जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 15:51 IST2026-03-16T15:49:47+5:302026-03-16T15:51:25+5:30

वनाधिकाऱ्यांकडून विचारपूस

Two injured in a gaur attack in Dhondewadi Karad Taluka Satara | Satara News: धोंडेवाडीत भरवस्तीत गव्याचा हल्ला, दोघे जखमी 

Satara News: धोंडेवाडीत भरवस्तीत गव्याचा हल्ला, दोघे जखमी 

मलकापूर : धोंडेवाडी (ता. कराड) येथे शनिवारी सकाळी ९.३० वाजता हनुमान चौकात मुलाला तर १० वाजता दऱ्यात एका वृद्धाला गव्याने धडक देऊन जखमी केले. घटनेनंतर तत्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळतात वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारसपूस केली.

वेदांत संतोष पाटील (वय १६) व सदाशिव धोंडिराम काकडे (८५ दोघेही रा. धोंडेवाडी, ता. कराड ) अशी जखमींची नावे आहेत. घटनास्थळावरून व वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार धोंडेवाडी, ता. कराड येथे सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दोन गवे थेट लोकवस्तीत घुसले. त्यांना गावातून हुसकावताना हनुमान चौकात उभ्या असलेल्या एका मुलाला धडक देऊन गावाबाहेर गेले. पुढे जाऊन रानातून घरी येत असलेल्या एका वृद्धाला धडक देऊन जखमी केले. 

या दोन्ही जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील, वनपाल आनंद जगताप, सुहास भोसले, वनरक्षक अभिजित शेळके, कैलास सानप, अक्षय पाटील, रोहन मान, अभिनंदन सावंत, निखिल कदम यांच्यासह कर्मचाऱ्यांनी जखमी केलेल्या घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांमध्ये गव्याबाबत जनजागृती कली.

Web Title : सतारा: धोंडेवाड़ी में गौर का हमला, दो घायल; दहशत।

Web Summary : कराड के धोंडेवाड़ी में गौर के हमले में दो घायल। एक लड़का और एक बुजुर्ग आदमी घायल हो गए। वन विभाग के अधिकारियों ने जांच की और जागरूकता फैलाई।

Web Title : Satara: Gaur attack in Dhondewadi injures two; panic ensues.

Web Summary : Two injured in Dhondewadi, Karad after gaur attacks. A boy and an elderly man were hit. Forest officials investigated and provided awareness.