शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

अठ्ठावीस गावांना दूषित पाणी

By admin | Updated: July 11, 2014 00:39 IST

वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती : ग्रामपंचायतींना बजावल्या नोटिसा

कऱ्हाड : तालुक्यातील अठ्ठावीस गावांना दूषित पाणीपुरवठा होत असून संबंधित ग्रामपंचायतींना नोटीस देण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी सुनील कोरबू यांनी गुरूवारी पंचायत समितीच्या सभेत बोलताना दिली. आरोग्य विभागाच्या वतीने पाण्याचे नमुने तपासण्यात आले होते. या तपासणीत संबंधित अठ्ठावीस गावांतील पाण्याचे नमुने दूषित असल्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाल्याचेही डॉ. कोरबू यांनी यावेळी स्पष्ट केले. येथील पंचायत समितीची मासिक सभा सभापती देवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपसभापती विठ्ठलराव जाधव, गटविकास अधिकारी अरविंद पाटील उपस्थित होते. धोंडिराम जाधव यांनी ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे अनेक गावांची कामे प्रलंबित राहिली आहेत, असे सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांसह ग्रामविकास मंत्री व सहकार मंत्र्यांनी चर्चा करून तोडगा काढण्याचा ठराव करण्यात आला.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कोरबू म्हणाले, तालुक्यातील सुपने, साजूर, गोटे, कोरेगाव, वडगाव हवेली, शेरे, कापील, गोळेश्वर, शेणोली, भोसलेवाडी, येणके, कुसूर, वडगाव, भांबे, मस्करवाडी, चोरे, हेळगाव, बेलवडे बुद्रुक, करवडी, टेंभू, बाबरमाची आदी गावांतील पाण्याचे नमुने दूषित आले आहेत. त्यांना नोटीस पाठविल्या आहेत. टेंभू येथील आगरकर हायस्कूलमध्ये दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला मिळत नाही. संबंधित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी यावेळी धोंडिराम जाधव यांनी केली. यावेळी सभापती देवराज पाटील आक्रमक झाले. पंचायत समितीचा शिक्षण विभाग तातडीने माध्यमिक विभागाला याबाबत कल्पना देईल, असे गायकवाड यांनी यावेळी सभागृहाला सांगितले. (प्रतिनिधी)