शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘सीसीटीव्ही संगणक’ समजून फोडला टीव्ही

By admin | Updated: November 16, 2014 00:05 IST

मसूरमध्ये घबराट : मागील चोऱ्यांचा तपासातील अपयशामुळे पोलिसांसमोर आव्हान

मसूर : कऱ्हाड-मसूर रस्त्यावर तसेच शामगाव रस्त्यावरील फोडलेल्या दुकानांतील चोरट्यांचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश आलेले आहे. हॉटेल मंदारमध्ये नुकत्या झालेल्या चोरीतील चोरट्यांनी सीसीटीव्हीचा मॉनिटर समजून टीव्ही फोडला असला तरी ते सीसीटीव्ही कॅमेऱ्याने कैद केले आहेत. त्यामुळे या चोरट्यांना गजाआड करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.मसूरला चोरट्यांनी लक्ष्य केल्यामुळे ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण दिसत आहे. ग्रामस्थ रात्री घराबाहेर पडायलाही घाबरत आहेत. आठ महिन्यांपूर्वी ‘चोरटे आले रे, चोरटे दिसले रे...’ अशा आरोळ्या ठोकत ग्रामस्थांनी रात्रगस्त सुरू केली होती. त्यामध्ये ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. चोरट्यांनी हॉटेल फोडताना प्रथम ग्रीलचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये अपयश आल्याने त्यांनी खिडकीचा दरवाजा कटावणीने काढला. ग्रीलची खिडकी उचकटूनच काढून आत प्रवेश केला. आतील टीव्ही म्हणजे सीसीटीव्हीचे फुटेज पाहायचा मॉनेटर आहे, असे समजून त्यांनी टीव्ही फोडला असावा, असा संशय हॉटेलमालक विजय माळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. मात्र, सुदैवाने सीसीटीव्हीत चोरटे जेरबंद झाले आहेत. त्यापैकी एकाने डोक्यावर टोपी घातली होती. तर दुसऱ्याने तोंडाला रूमाल बांधला होता. साधारणत: हे चोरटे पंचवीस ते तीस वयाचे असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यापूर्वीच्या घटनांत चोरट्यांनी दरवाजे तोडण्यासाठी हायड्रोलीक गॅसकटरचा वापर केला होता. आताच्या चोरीत कटावणीचा वापर झाला आहे. त्यामुळे चोरीची पद्धत वेगळी आहे. चोरटे चोरी करण्यासाठी वेगवेगळळ्या पद्धतीचा वापर केला असल्याची चर्चा आहे. (वार्ताहर)