शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गुटखा तस्कराकडून ‘अन्न औषध’च्या अधिकाऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न

By admin | Updated: January 23, 2017 23:38 IST

शिवडेतील घटना : अपघातग्रस्त कारमध्ये होता १२० पोती गुटखा; संशयित पसार

कऱ्हाड/उंब्रज : अपघातग्रस्त कारमध्ये पोलिसांना २ लाख ७० हजार रुपये किमतीची गुटख्याच्या पुड्या भरलेली तब्बल १२० पोती आढळून आली. पोलिसांनी ती जप्त करून आरोपीसह मुद्देमाल अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात दिला. गुटखा तस्करांनी ‘अन्न व औषध’च्या अधिकाऱ्याला कारमधून खाली ढकलून चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी व अन्य दोघेजण गुटख्याने भरलेल्या गाडीसह पसार झाले. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील शिवडे हद्दीत सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.ओमप्रकाश वीरभाराम बिष्णोई (रा. बिबेवाडी, पुणे) असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड शहर गुंजवटे, सहायक निरीक्षक संतोष चौधरी यांच्यासह पथक रविवारी रात्री गस्त घालत होते. मध्यरात्री एकच्या सुमारास हे पथक कोल्हापूर नाका परिसरात असताना साताऱ्याच्या दिशेने निघालेल्या कारचा (एमएच १२ एलव्ही ५७५६) टायर फुटल्याने कार दुभाजकाला धडकून अपघातग्रस्त झाली. घटना निदर्शनास येताच पोलिस पथक तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी कारचा चालक ओमप्रकाश बिष्णोई याला कारमधून खाली उतरवले. तसेच कारची पाहणी केली. त्यावेळी कारमध्ये गुटख्याच्या पुड्या भरलेली तब्बल १२० पोती आढळून आली. पोलिसांनी चालक बिष्णोई याच्यासह संबंधित कार ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात आणली. कायदेशीर कार्यवाही पार पडल्यानंतर शहर पोलिसांनी या कारवाईची माहिती साताऱ्याच्या अन्न व औषध प्रशासनला दिली. सकाळी अन्न सुरक्षा अधिकारी राजेंद्र काकडे, राहुल खंडागळे व नमुना सहायक सुनील सर्वगोड असे तिघेजण कऱ्हाडला दाखल झाले. त्यांनी जप्त केलेल्या गुटख्याचा पंचनामा केला. तसेच आरोपी बिष्णोई याच्यासह संबंधित गुटखा ताब्यात घेतला. गुटखा व आरोपीला साताऱ्याला नेण्यासाठी खासगी कारची आवश्यकता होती. त्यावेळी आरोपी बिष्णोई यानेच त्याच्या एका मित्राला कार (एमएच १४ एफएक्स ७१२४) घेऊन पोलिस ठाण्यात बोलवले. काही वेळानंतर संबंधित मित्र व अन्य एकजण कार घेऊन पोलिस ठाण्यात आले. त्या कारमध्ये गुटखा भरण्यात आला. तसेच अन्न व औषधचे नमुना सहायक सुनील सर्वगोड, चालक व अनोळखी एकजण त्या कारमध्ये बसला. संबंधित कार साताऱ्याकडे मार्गस्थ झाली. तर त्यापाठोपाठ अन्न सुरक्षा अधिकारी राजेंद्र काकडे व राहुल खंडागळे आरोपी बिष्णोई याला घेऊन कारने साताऱ्याकडे निघाले.दरम्यान, संबंधित कार व कार दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शिवडे गावच्या हद्दीत गणेश हॉटेलनजीक पोहोचल्यानंतर अधिकाऱ्यांनी जेवण करण्यासाठी वाहने थांबविली. त्याठिकाणी आरोपीसह सर्वांनी जेवण केले. त्यानंतर सर्वजण गाडीत बसण्यासाठी निघाले. कारचा चालक व त्याच्यासोबतचा अनोळखी व्यक्ती कारमध्ये बसला. बिष्णोईही धावत जाऊन कारमध्ये चढला. त्याने अन्न औषधचे नमुना सहायक सर्वगोड यांना खाली ढकलून दिले. तसेच त्यांच्या अंगावर कार घालण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी बिष्णोई याच्यासह संबंधित कारचा चालक व अनोळखी एकजण २ लाच ७० हजारांचा गुटखा घेऊन पुण्याच्या दिशेने पळाले. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी राजेंद्र काकडे यांनी उंब्रज पोलिसांत फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक शिवाजीराव जगताप तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)