शिरवळमध्ये रचला सापळा; दोघांच्या मुसक्या आवळल्या- लाखाचा मुद्देमाल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 19:34 IST2020-02-11T19:32:51+5:302020-02-11T19:34:22+5:30
सातारा : चोरी केलेले मोबाईल विक्रीसाठी आणणाºया दोघा चोरट्यांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या. ही कारवाई शिरवळ येथे करण्यात ...

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरीचे मोबाईल आणि एलसीडी हस्तगत केला.
सातारा : चोरी केलेले मोबाईल विक्रीसाठी आणणाºया दोघा चोरट्यांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या. ही कारवाई शिरवळ येथे करण्यात आली. यामध्ये कार, ११ मोबाईल, एका एलसीडीसह एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना खबºयामार्फत शिरवळ येथे कारमधून चोरीचे मोबाईल विक्रीस काहीजण येणार आहेत, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार शिरवळ येथे जाऊन कारवाई करण्याविषयी पोलीस निरीक्षक पाटील यांनी सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांच्या पथकाला सूचना केली. त्यानंतर शिरवळ बसस्थानक परिसरात सापळा रचला. त्यावेळी कार (एमएच १२ एएफ ३६७०) आलेले दोघेजण परिसरात संशयितरीत्या फिरत असल्याचे दिसून आले. त्यांना थांबवून झडती घेतल्यावर ११ मोबाईल, एक एलसीडी मिळून आला.
याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी अनिल अंकुश काळे (वय १९, रा. खंडाळा. मूळ रा. शिर्डी, जि. अहमदनगर) आणि दीपक ऊर्फ राजकुमार रामतीरत गौतम (वय २०, रा. गोरखपूर, उत्तरप्रदेश. सध्या रा. इंदापूर, जि. पुणे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून कार, ११ मोबाईल आणि एक एलसीडी हस्तगत केला आहे. तर संशयितांना शिरवळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, डॉ. सागर वाघ, सहायक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, जोतिराम बर्गे, हवालदार मोहन नाचण, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, संतोष जाधव, प्रवीण कडव, गणेश कापरे, धीरज महाडिक, केतन शिंदे, वैभव सावंत, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन यांनी सहभाग घेतला.