शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

म्हसवड बसस्थानकातील वाहतूक नियंत्रणाचे कक्ष बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:36 IST

म्हसवड : म्हसवड बसस्थानकाचे बांधकाम कित्येक महिन्यापासून रखडले आहे. सध्या तात्पुरत्या पत्राच्या शेडमध्ये तात्पुरते बसस्थानक सुरू आहे. यामुळे प्रवाशांना ...

म्हसवड : म्हसवड बसस्थानकाचे बांधकाम कित्येक महिन्यापासून रखडले आहे. सध्या तात्पुरत्या पत्राच्या शेडमध्ये तात्पुरते बसस्थानक सुरू आहे. यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बसस्थानकात दोन वाहतूक निरीक्षकांची नेमणूक असताना एकजणच कामावर आहे. रविवारी कामावर रुजू असणाऱ्या वाहतूक नियंत्रकाची साप्ताहिक सुटी असल्याने कार्यालय कुलूपबंद होते. प्रवाशांनी बसची विचारणा नेमकी कोणाकडे करायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

म्हसवड शहर नगरपरिषदेचे शहर असून, या शहराच्या परिसरात बारा वाड्या, बारा खेडी आहेत. माण तालुक्यातील सर्वांत मोठे लोकसंख्या असलेले शहर आहे. या ठिकाणी महाराष्ट्र आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यातील अनेकांचे कुलदैवत श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरीचे पुरातन मंदिर आहे. त्यामुळे वर्षभर भाविकांची वर्दळ असते. त्यातच दररोज हजारो प्रवासी प्रवास करीत असतात. प्रवाशांची व भाविकांची सोय व्हावी म्हणून एसटी महामंडळाने येथील जुने बसस्थानक जमीनदोस्त करून नवीन अद्ययावत बसस्थानक उभारण्यासाठी तीन वर्षांपूर्वी बांधकाम सुरू केले आहे. कामात सातत्य नसल्याने हे काम अजूनही रखडल्याने सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रवाशांना सावली व पिण्याचे पाणी मिळत नसल्याने प्रचंड हाल होत आहेत. म्हसवड बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांची अवस्था आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे. महामंडळाच्या दुर्लक्षामुळेच बसस्थानकात घाणीचे साम्राज्य व बाहेरील दुकान हॉटेल व रहिवाशांचे गटारीचे घाण पाणी बसस्थानकात येत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याकडे महामंडळाचे व नगरपरिषदेचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रवासी करीत आहेत.

फोटो आहे...

राज्य परिवहन महामंडळाच्या म्हसवड आगारातील वाहतूक नियंत्रकाचे कक्ष रविवारी दिवसभर बंद होते. (छाया : सचिन मंगरुळे)