कास पठारावर विविधरंगी फुलांसह पर्यटकांचा बहर; कुमुदिनीच्या पांढऱ्या कमळांचे आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 04:03 PM2022-09-26T16:03:43+5:302022-09-26T16:13:08+5:30

विविधरंगी फुलांचे गालिचे, निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पुष्प पठारावर गर्दी

Tourists bloom with colorful flowers on Kas plateau | कास पठारावर विविधरंगी फुलांसह पर्यटकांचा बहर; कुमुदिनीच्या पांढऱ्या कमळांचे आकर्षण

छाया : सागर चव्हाण

googlenewsNext

पेट्री : शहराच्या पश्चिमेस जागतिक वारसास्थळ कास पठारावरपर्यटनासाठी राज्यासह देश-विदेशातून बहुसंख्य पर्यटक भेट देत असून. राजमार्गावरील कुमुदिनीची पांढरी शुभ्र कमळाची फुले पर्यटकांना आकर्षित करत आहेत. रविवारी शेकडो वाहनांच्या ताफ्यासह हजारोंच्या संख्येने पर्यटकांनी कासच्या फुलोत्सवाचा आनंद लुटला.

विविधरंगी फुलांचे गालिचे, निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पुष्प पठारावर कुटुंबासमवेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. दरम्यान कास- महाबळेश्वर राजमार्गावरील तीन किलोमीटर अंतरावरील पांढऱ्या शुभ्र कुमुदिनी फुलांचे पर्यटकांना आकर्षण होऊ लागल्याने पायी चालत या ठिकाणी मोठ्या संख्येने  पर्यटक फुलांची पर्वणी स्वानुभवताना दिसत आहेत.

पठारावर सतत पर्यटकांची रेलचेल सुरू असून, ठिकठिकाणी गाईड पर्यटकांना येथील दुर्मीळ फुलांचे व वनस्पतींसंदर्भात पर्यटकांना मार्गदर्शन करीत आहेत. पठारावरील जैवविविधता पाहता कास पठाराची ख्याती जगभर पसरलेली आहे. कास पठार हे निसर्गाचे वरदान आहे. कित्येक पर्यटक येथील फुलांसमवेत आपल्या आठवणी कायम स्मरणात राहाव्यात, यासाठी येथील मनाला मोहिनी घालणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहेत.

कुमुदिनी तकुमुदिनी तलाव हाऊसफुल्ल

कास पठारावर परदेशी पाहुणे देखील येथील फुलांचा नजराणा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने दाखल होऊ लागले आहेत. परदेशी पर्यटकांनी पठाराला भेट देऊन येथील दुर्मीळ फुलांचे कौतुक केले आहे. तसेच तीन किलोमीटर अंतर पायी चालत देश-विदेशातील बहुसंख्य पर्यटकांची पावले राजमार्गावरील कुमुदिनी तलावाकडे वळत आहेत.

कास पुष्प पठारावर साधारण ३७५ फुलांच्या प्रजाती असून, सध्या ४० ते ५० प्रकारच्या प्रजातींचे फ्लॉवरिंग सुरू आहे. नवरात्रोत्सवात आणखी प्रजातींच्या फुलांचे फ्लॉवरिंग होण्याची शक्यता आहे. - रामानुज, मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर सर्कल
 

कास पुष्प पठारावरील साडेतीनशेच्या आसपास दुर्मीळ प्रजाती वर्षभर येतात. चाळीस ते पन्नास प्रकारच्या प्रजातींचे फ्लॉवरिंग सुरू आहे. गतवर्षीपेक्षा यंदा चांगले फ्लॉवरिंग आहे. फ्लॉवरिंगसाठी वातावरणपोषक आहे. यापेक्षा पुढील वर्षी अधिक  चांगल्या प्रकारची फुले पाहावयास मिळतील.- महादेव मोहिते, उपवनसंरक्षक, सातारा

Web Title: Tourists bloom with colorful flowers on Kas plateau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.