शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरात पर्यटकांचा ‘सेल्फी विथ धबधबा’

By admin | Updated: August 1, 2016 00:48 IST

पावसातही घोडसवारीला पसंती : सलग सुट्यांमुळे नंदनवन बहरले; गर्दीमुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी

महाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला असून, पावसाची रिपरिप, दाट धुके अंगात हुडहुड भरणारी थंडी, हिरवागार निसर्ग अशा वातावरणात पर्यटक येथील हिरवाईचा मनमुराद आनंद लुटत आहेत. पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या येथील लिंगमळा धबधबा, अंबेनळी धबधबा, वेण्णा लेक परिसर पर्यटकांनी बहरून जात आहे. अनेक पर्यटक याठिकाणी धबधब्यांसंगे ‘सेल्फी’ काढत असल्याचे पाहावयास मिळत आहे. सलग सुट्यांमुळे पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगलीसह गुजराती पर्यटक पावसाळी पर्यटनासाठी महाबळेश्वरला मोठ्या संख्येने भेट देत आहेत. शनिवार, रविवार सुटीचे दिवस असल्याने महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहत आहे. सध्या महाबळेश्वरातील लिंगमळा व अंबेनळी घाटातील धबधबा पर्यटकांना आकर्षित करीत आहे. या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. काहीजण सैराटच्या गाण्यावर झिंगाट होऊन तराट नाचत होते. महाबळेश्वरचा प्रसिद्ध भेकवली या गावामधील लिंगमळा धबधबाही पर्यटकांना खुणावत आहेत. याठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहे. मुसळधार पाऊस आणि लिंगमळा धबधब्याचे डोंगरावरून पडणारे पांढरे शुभ्र फेसाळलेल्या पाण्यासोबत अनेक पर्यठक ‘सेल्फी’ काढण्यासाठी गर्दी करत होते. सायंकाळी बाजारपेठ गर्दीने बहरुन जात आहेत. (प्रतिनिधी) कणसांना मागणी वाढली ४महाबळेश्वरचा पाऊस आणि येथील थंड हवेने पर्यटकांच्या अंगात नेमहीच हुडहुडी भरते. या थंडीपासून बचाव व्हावा, यासाठी पर्यटकांमधून मक्याच्या कणसांना मोठी मागणी होत आहे. शहरात ठिकठिकाणी कणसांची विक्री करणारे छोटे-मोठे व्यावसायिक आहेत. या व्यवसायावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. कणसांना मागणी वाढल्याने व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हुल्लडबाजांना आवरा... ४महाबळेश्वरला भेट देणारे अनेक पर्यटक येथील धबधब्यांना भेटी देऊन पर्यटनाचा आनंद लुटत आहे. यापैकी काही हुल्लडबाज युवक कशाचीही तमा न बाळगता मराठी, हिंदी गाण्यांवर बेधुंद होऊन धबधब्याच्या ठिकाणी नृत्य करीत आहेत. याचा इतर पर्यटकांना त्रास होत असून, हुल्लडबाज युवकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. पावसातही घोडसवारी ४पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र असलेल्या येथील वेण्णा तलावात नौकाविहार बंद करण्यात आले असले तरी पर्यटक घोडसवारीला पसंती देत आहे. दाट धके अन् पावसामधून घोडसवारी करण्याचा आनंद काही औरच असतो, असे पर्यटक आवर्जून सांगत आहेत. पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून घोडसवारी व्यवसाय बंद होता. मात्र, दोन दिवसांपासून पर्यटकांची संख्या वाढल्याने व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.