मजुरांअभावी टोमॅटो उत्पादन शेतकऱ्यांवर संकट-बदलते वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:20 IST2018-07-24T00:19:55+5:302018-07-24T00:20:24+5:30

मजुरांअभावी टोमॅटो उत्पादन शेतकऱ्यांवर संकट-बदलते वातावरण
पिंपोडे बुद्रुक : दराची लॉटरी तर कधी दराअभाव बांधावर अथवा रस्त्यावर होणारा लाल चिखल यामुळे बेभरवशी झालेल्या टोमॅटो उत्पादनातून किमान आर्थिक नफा मिळावा, यासाठी शेतकºयांकडून टोमॅटो उत्पादनाचे बारमाही नियोजन केले जात आहे.
वाढता भांडवली खर्च, दिवसेंदिवस बदलती वातावरणीय परिस्थिती, मजुरांचा तुटवडा आदी कारणांमुळे शेतकºयांना टोमॅटो उत्पादनासाठी मोठ्या संकटांचा सामना करावा लागत असून, ही परिसरातील शेतकरी टोमॅटोचे उच्चांकी उत्पादन घेत आहेत. परंतु गेल्या काही दिवसांत टोमॅटोच्या दरात होणारा चढ-उतार यामुळे शेतकºयांना टोमॅटो उत्पादनातून तोटा सहन करावा लागत आहे. यासाठी परिसरातील शेतकºयांकडून टोमॅटोच्या बारमाही उत्पादनावर भर दिल्याचे दिसत आहे. यात वर्षभरात शेतकºयांकडून काही महिन्यांच्या फरकाने टोमॅटोची लागवड करून संपूर्ण वर्षभर माल बाजारात पाठविण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्यामुळे बाजारातील अधूनमधून वाढणाºया वाढीव दरचा फायदा टोमॅटो उत्पादक शेतकºयाला होण्याची शक्यता असते.
शेतकºयांकडून केल्या जाणाºया बारमाही नियोजनातून काही अंशी फायदा मिळत असला तरी संबंधित पिकाचा भांडवली खर्च विचारात घेता शेतकºयांना बारमाही नियोजन करणे आर्थिकदृष्ट्या जिकिरीचे झाले आहे. याशिवाय त्यातून अपेक्षित दर मिळून नफा मिळणेही अनिश्चितच आहे.
प्रक्रिया उद्योगसाठी सहकार्य गरजेचे..
पिंपोडे बुद्रुक येथील टोमॅटोवर प्रक्रिया करून चिप्स, सॉस व इतर काही पदार्थ तयार करण्यास शासनाने शेतकºयांना प्रोत्साहित करून मदत केल्यास शेतकºयांना निश्चितच याचा मोठा फायदा
होईल.
दरातील चढ-उतारामुळे शेतकरी टोमॅटो उत्पादनाचे बारमाही नियोजन करत असले तरी भांडवली खर्च जादा असल्याने एखाद्या वेळेस जादा दर मिळूनही निव्वळ नफा मिळणे अशक्य झाले आहे.
-गणेश धुमाळ, चेअरमन, विकास सेवा सोसायटी