शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Leopard Attack: शहापूरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, हल्ल्यात तिघे जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 12:30 IST

Leopard Attack in Karad: शिवारात सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे अन् पिंजरा

कराड/मसूर : कराड तालुक्यातील शहापूरमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तिघे जण जखमी झाले आहेत. यामध्ये उसाला पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुणाचा समावेश आहे. या घटना शनिवारी आणि रविवारी घडल्या. पोलिस पाटील प्रशांत नामदास व सामाजिक कार्यकर्ते संदीप बाबर यांनी या घटनेची माहिती दिली. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.निखिल मारुती वांगडे, जयवंत बबन फसाले, सौरभ श्रीकांत कदम, अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर कराडमधील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत माहिती अशी की, शनिवारी (२८ रोजी) सायंकाळी चार-साडेचार वाजेच्या सुमारास निखिल मारुती वांगडे (वय ३०, रा. पिंपरी, ता. कराड) हे उसाला पाणी देण्यासाठी गेले होते. त्यांच्यावर खोडसकर शिवारात बिबट्याने हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले, तसेच रविवारी सकाळी १०:१५ वाजेच्या सुमारास जयवंत बबन फसाले (वय २८, रा. शहापूर, ता. कराड) याच्यावर उसाला पाणी देत असताना माळ नावाच्या शिवारात बिबट्याने अचानक हल्ला केला. पाठोपाठ दुपारी सव्वातीनच्या सुमारास सौरभ श्रीकांत कदम (वय २५, रा. शहापूर) याच्यावर उसाला पाणी देताना अचानकपणे बिबट्याने हल्ला केला.यामध्ये बिबट्या व संबंधित युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात झटापट झाल्याचे घटनास्थळी दिसून आले. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती समजताच वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्यात आली. साताराचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली एसीएफ जयश्री जाधव, वनक्षेत्रपाल वनाधिकारी ललिता पाटील, सुहास भोसले, सुभाष गुरव, आनंद जगताप, रोहन माने, सानिका घाडगे, पूजा खंडागळे, अक्षय पाटील यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन बचाव मोहीम सुरू केली.

शिवारात सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे अन् पिंजराशिवारात पिंजरा बसविण्यात आला आहे. सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे बिबट्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard Terror in Shahapur: Three Injured in Attack

Web Summary : A leopard attacked and injured three people in Shahapur, Satara. The victims, including farmers watering sugarcane fields, are receiving treatment. Forest officials have launched a search operation, deploying CCTV, drones, and cages to capture the leopard.
टॅग्स :KaradकराडSatara areaसातारा परिसरLeopard Attackबिबट्याचा हल्लाforest departmentवनविभाग