Leopard Attack: शहापूरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, हल्ल्यात तिघे जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 12:30 IST2026-03-30T12:20:44+5:302026-03-30T12:30:51+5:30

Leopard Attack in Karad: शिवारात सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे अन् पिंजरा

Three people injured in leopard attack in Shahapur Karad taluka | Leopard Attack: शहापूरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, हल्ल्यात तिघे जण जखमी 

Leopard Attack: शहापूरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, हल्ल्यात तिघे जण जखमी 

कराड/मसूर : कराड तालुक्यातील शहापूरमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तिघे जण जखमी झाले आहेत. यामध्ये उसाला पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुणाचा समावेश आहे. या घटना शनिवारी आणि रविवारी घडल्या. पोलिस पाटील प्रशांत नामदास व सामाजिक कार्यकर्ते संदीप बाबर यांनी या घटनेची माहिती दिली. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

निखिल मारुती वांगडे, जयवंत बबन फसाले, सौरभ श्रीकांत कदम, अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर कराडमधील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत माहिती अशी की, शनिवारी (२८ रोजी) सायंकाळी चार-साडेचार वाजेच्या सुमारास निखिल मारुती वांगडे (वय ३०, रा. पिंपरी, ता. कराड) हे उसाला पाणी देण्यासाठी गेले होते. त्यांच्यावर खोडसकर शिवारात बिबट्याने हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले, तसेच रविवारी सकाळी १०:१५ वाजेच्या सुमारास जयवंत बबन फसाले (वय २८, रा. शहापूर, ता. कराड) याच्यावर उसाला पाणी देत असताना माळ नावाच्या शिवारात बिबट्याने अचानक हल्ला केला. पाठोपाठ दुपारी सव्वातीनच्या सुमारास सौरभ श्रीकांत कदम (वय २५, रा. शहापूर) याच्यावर उसाला पाणी देताना अचानकपणे बिबट्याने हल्ला केला.

यामध्ये बिबट्या व संबंधित युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात झटापट झाल्याचे घटनास्थळी दिसून आले. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती समजताच वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्यात आली. साताराचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली एसीएफ जयश्री जाधव, वनक्षेत्रपाल वनाधिकारी ललिता पाटील, सुहास भोसले, सुभाष गुरव, आनंद जगताप, रोहन माने, सानिका घाडगे, पूजा खंडागळे, अक्षय पाटील यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन बचाव मोहीम सुरू केली.

शिवारात सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे अन् पिंजरा

शिवारात पिंजरा बसविण्यात आला आहे. सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे बिबट्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

Web Title : शाहपुर में तेंदुए का आतंक: हमले में तीन घायल

Web Summary : सतारा के शाहपुर में एक तेंदुए ने हमला कर तीन लोगों को घायल कर दिया। गन्ने के खेतों में पानी दे रहे किसानों सहित पीड़ितों का इलाज चल रहा है। वन विभाग ने तेंदुए को पकड़ने के लिए सीसीटीवी, ड्रोन और पिंजरों का उपयोग करते हुए तलाशी अभियान शुरू किया है।

Web Title : Leopard Terror in Shahapur: Three Injured in Attack

Web Summary : A leopard attacked and injured three people in Shahapur, Satara. The victims, including farmers watering sugarcane fields, are receiving treatment. Forest officials have launched a search operation, deploying CCTV, drones, and cages to capture the leopard.