बाथरुममध्ये शॉक लागून तेरा वर्षाच्या शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू, औंधमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 15:37 IST2022-05-19T15:35:03+5:302022-05-19T15:37:31+5:30
वायर पीयूषच्या पाठीवर अचानक लागली. त्यामुळे त्याला जोरदार शॉक लागला. त्याला तातडीने औंध येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला

बाथरुममध्ये शॉक लागून तेरा वर्षाच्या शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू, औंधमधील घटना
सातारा : बाथरुममध्ये अंघोळ करत असताना पत्र्याला जुन्या वायरचा शॉक बसून तेरा वर्षाच्या शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पीयूष सुनील यादव (वय १३, रा. औंध, ता. खटाव, जि. सातारा) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी औंध, ता. खटाव येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीयूष हा बाथरुममध्ये सकाळी अंघोळ करण्यासाठी गेला. यावेळी बाथरुममधून जुनी वायर लोंबकळत होती. या वायरमध्ये शॉक होता. ही वायर पीयूषच्या पाठीवर अचानक लागली. त्यामुळे त्याला जोरदार शॉक लागला. त्याला तातडीने औंध येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची औंध पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, हवालदार चंद्रकांत पाटील हे अधिक तपास करीत आहेत.