शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

तेरा हजार कोरोना वॉरियर्सला मिळणार सुरक्षाकवच : प्रोत्साहन भत्ता, विमा संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 23:02 IST

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी गावपातळीवर आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्त्या यांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता व ९० दिवसांसाठी पंचवीस लाख रुपयांचा विमा उतरण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतला.

ठळक मुद्देजिल्ह्यात गावोगावी ग्रामपंचायत कर्मचारी औषध फवारणी करीत आहेत.ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्त्यांचा समावेश

स्वप्नील शिंदे ।सातारा :ग्रामीण भागातील लोकांसाठी रात्रं - दिवस ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा कार्यकर्त्या झटत आहेत. या योद्ध्यांना शासनाने प्रोत्साहनपर भत्ता व विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील १३ हजार ३३१ जणांना सुरक्षाकवच मिळाले आहे.

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी गावपातळीवर आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्त्या यांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता व ९० दिवसांसाठी पंचवीस लाख रुपयांचा विमा उतरण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतला.

सध्या गावपातळीवर हे कर्मचारी ग्रामस्थांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती, स्वच्छता, आरोग्यविषयक सर्वेक्षण, औषध फवारणी अशी कामे अहोरात्र करत आहेत. ही कामे या सर्व कर्मचाऱ्यांच्या कामाचा भाग असला तरी जोखीम पत्करून हे कर्मचारी काम करत आहेत म्हणून त्यांना एक हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम अदा करण्यात येणार आहे. यासाठी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याज व या वित्त आयोगातील गेल्या पाच वर्षांतील अखर्चित निधी आरोग्य आणि उपजीविका यासाठी वित्त आयोगाच्या निधीतील २५ टक्के तरतूद, तसेच जिल्हा परिषद सेस फंड याचा वापर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यातील २३५२ ग्रामपंचायत कर्मचारी, ४६१२ अंगणवाडी सेविका, ३६५४ अंगणवाडी मदतनीस, २७१३ आशा कार्यकर्त्या अशा एकूण १३ हजार ३३१ कर्मचा-यांना लवकरच केलेल्या कामाबद्दल प्रोत्साहनपर भत्ता व विमा देण्यात२ येणार आहे.

 

कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी शासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. या निर्णयाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्त्या हे आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यांचा विमा काढण्याची लवकरच प्रक्रिया सुरू होईल.-अविनाश फडतरे , उपमुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषद सातारा

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस