Satara: शिरवळ येथील चोरीतील आंतरजिल्हा टोळी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 13:00 IST2023-08-22T13:00:16+5:302023-08-22T13:00:50+5:30
मुराद पटेल शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील औदयोगिक क्षेञातील एका कंपनीतील चोरी प्रकरणी शिरवळ पोलिसांनी धडक कारवाई करत सराईत ...

Satara: शिरवळ येथील चोरीतील आंतरजिल्हा टोळी जेरबंद
मुराद पटेल
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील औदयोगिक क्षेञातील एका कंपनीतील चोरी प्रकरणी शिरवळ पोलिसांनी धडक कारवाई करत सराईत आंतरजिल्हा टोळीच्या अवघ्या दोन दिवसांमध्ये मुसक्या आवळल्या.
याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरवळ येथील पंढरपूर फाट्याजवळील नायगाव रोडला ट्रान्सफार्मर तयार करणारी कंपनी असून मध्यराञी शनिवारी (दि. 12) कंपनी आवारामध्ये चार ते पाच अनोळखी व्यक्तींनी प्रवेश करीत स्टोअर रुम, शाँप फ्लोअरमधून सुमारे 10 लाख 58 हजार 400 रुपयांचा 1512 किलो वजनाचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला. सदरील घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली होती.
पोलिसांना तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित चोरटे हे कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळताच शिरवळ पोलिसांनी अविनाश दिपक मछले उर्फ अविनाश कोकाटे (वय 24), स्वप्निल महेश गारुंगे (23 दोघे रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) यांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी पिकअप (क्रं.एमएच-09-एफवाय-2599) चालक शिवाजी प्रभु तोरे (वय 42, रा. कोल्हापूर मूळ रा. जिवळी जि.उस्मानाबाद) व चोरीचे साहित्य घेणारा विनायक बाळासो गोसावी (42, रा. गुटकेश्वर काँलनी, शिंगणापूर, कोल्हापूर) यांना जेरबंद केले.
संशयित आरोपींना खंडाळा येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नवनाथ मदने हे करीत आहे.