शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

त्यांना जमतेय... मग यांना काय होतेय?

By admin | Updated: August 6, 2015 20:40 IST

साताऱ्यातील चित्र : व्यवसायाच्या नावाखाली हव्यात मोक्याच्या जागा

सातारा : ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे फळ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे कारणे देऊन नगर पालिकेने नुकतेच राजवाडा परिसारतील फळ विक्रेत्यांसमोर लोटांगण घातले. आणि लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले फ्रूट मार्केट तसेच पडून राहिले. या उलट पालिका प्रशासनाचा आदेश मानून पंचायत समितीच्या आड रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून फळविक्रेते आणि अलीकडेच आलेले स्वेटर व्यावसायिक त्यांचा व्यवसाय करत आहे. ‘त्यांना जमतयं... तर यांना का जमत नाही?,’ असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.सातारा शहरात शिस्तीचा प्रश्न येतो तेव्हा रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांविषयी चर्चा रंगते. गरिबांवर अन्याय नको, त्यांच्या व्यवसायावर परिणाम नको, ही भूमिका रास्त आहे. पण, प्रशस्त जागेत त्यांची सोय करूनही जर मुख्य रस्त्यावरच व्यवसाय होतो, हे म्हणणे पटत नाही.फळविक्रेते कुठेही बसले तरी त्यांच्याकडे ग्राहक येतो, हे सत्य कोणीच नाकारणार नाही. ग्राहक सेवेचा हा व्यवसाय असल्यामुळे ग्राहकांची पाठ अशी फिरत नाही. भाजी आणि फळे एकाच ठिकाणी मिळत असल्याने ग्राहक खूश असायला हवेत.राजवाडा परिसरातील फळ विक्रेत्यांना कायमस्वरूपी जागा मिळवून देण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. पुढील सप्ताहात याविषयी एक महत्त्वपूर्ण बैठक पालिका आणि फेरीवाला संघटनेत होणार आहे. या बैठकीनंतर त्यांना कोणती जागा द्यायची, हे स्पष्ट होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत राजवाडासमोर फळविक्रेते बसणार नाहीत. भविष्यात राजवाडा परिसर नो पार्किंग आणि नो हॉकर झोन होणार आहे. त्यामुळे येथे फळ विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी मज्जाव करण्यात येणार आहे. - अभिजीत बापट, मुख्याधिकारी, नगर पालिका, साताराचार ठिकाणे... चार निर्णय! शहराच्या विकासाआड आलेल्यांची गय करू नका, असे फर्मान सोडत लोकप्रतिनिधींनी अतिक्रमणांविषयीची आपली भूमिका काही महिन्यांपूर्वी स्पष्ट केली होती. त्यामुळे स्टॅण्ड परिसरातील रस्ता अतिक्रमण मुक्त झाल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे पंचायत समितीच्या बोळात फळ आणि स्वेटर विक्रेत्यांना जागा देऊन प्रशासनाने आपली भूमिका अधिक स्पष्ट केली.एवढेच काय जिल्हा परिषद परिसरात असलेल्या चायनिज व्यावसायिकांना तंबी देऊन सरळ करण्यात आले; पण राजवाडा फळ विक्रेत्यांजवळ आलं की, विकासाचं घोडं आडलं! ते का आडलं? याचे उत्तर एकच लोकप्रतिनिधीमुळे! शहराच्या तीन टोकांवर विकासाचा डंका पिटून स्थिर झालेल्या व्यावसायिकांना त्यांचा उद्योग हलवण्यास भाग पाडणाऱ्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना राजवाडा व्यावसायिकांचे असे कोणते दु:ख दिसले की, त्यांना शहराच्या विकासापेक्षाही त्यांच्या व्यवसायाचा कळवळा आला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.