'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 15:15 IST2025-10-15T14:56:53+5:302025-10-15T15:15:02+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसात जाहीर होणार आहेत. याआधी विरोधी पक्षांनी आज निवडणूक आयोगाला मतदार याद्यांबाबत निवेदन दिले.

'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीच्या मतदारयाद्यांचे स्वरूप कसे असावे यासंबंधी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी घेतलेल्या बैठकीत सूचना केल्या. मतदार यांच्यावरुन विरोधी पक्षांनी आयोगावर गंभीर आरोप केले. दरम्यान, आता मंत्री शंभूराज देसाई यांनी शिष्ठमंडळाच्या बैठकीवर टीका केली.
विरोध पक्ष पहिल्यापासूनच मतदार यादीत घोळ आणि व्हीव्हीपॅट मशीन बाबत मागणी करत आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार ज्या ठिकाणी निवडून येतात त्या ठिकाणी घोळ नसतो. त्यांचा पराभव झाला की, मशीन मध्ये घोळ असतो, असा टोला मंत्री देसाई यांनी लगावला.
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
"बॅलेट पेपर असताना मशीन काँग्रेस सरकारच्या काळात आले आहे, त्यावेळी त्यांनी ते स्वीकारले आहे. ज्यावेळेस या तक्रारी झाल्या आहेत, ही न्यायालयीन बाब देखील झाली होती. महाविकास आघाडीने तक्रारी करण्याशिवाय काही कामे केलेली नाहीत. येणाऱ्या निवडणुकीत त्यांना पराभव दिसू लागला आहे. याची कारण आधीच शोधायचे काम सुरू आहे, असा हल्लाबोल मंत्री शंभूराज देसाई यांनी केला.
उद्या पराभव जरी झाला, तरी जनतेला कारण काय द्यायची यासाठी हा चालेला खटाटोप आहे. निवडणूक आयोगावर विश्वास नाही, तर मग आपण का गेलात भेटायला. संजय राऊत दोन तोंडाने बोलतात.राऊत यांना फक्त तुम्ही महत्व देता इथं कोणीही महत्त्व देत नाही, अशी टीका देसाई यांनी केली.
जयंत पाटलांचा गंभीर आरोप
"सकाळी सगळ्या वृत्तवाहिन्यांवर मतदार याद्यांची बातमी दाखवता. त्यावर पुरावे समोर येतात. दुपारी ती नावे निवडणूक आयोगाच्या वेसाईटवर असतात पण, सायंकाळी सहा वाजता ती नावे गायब होतात. राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा महाराष्ट्रात दुसरं कोणतरी चालवतो', असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केला.
आज विरोधी पक्षातील नेत्यांनी एकत्र येत निवडणूक आयोगाला भेट दिली. यावेळी त्यांनी मतदार याद्यांतील घोळाबाबत प्रश्न उपस्थित केले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्याची मागणी केली. यावेळी पत्रकार परिषदेत आमदार जयंत पाटील यांनी गंभीर आरोप केले.