शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

... तर महाबळेश्वर, पाचगणी पुन्हा लॉकडाऊन :शेखर सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 12:58 PM

Mahabaleshwar Hill Station,Coronavirus Unlock, Panchgani Hill Station, Satara area कोरोना सध्या नियंत्रणात आहे. परंतु गर्दीमुळे पुन्हा जर प्रादुर्भाव वाढला तर महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटनस्थळांना पुन्हा लॉकडाऊन जाहीर करावा लागले, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला.

ठळक मुद्दे... तर महाबळेश्वर, पाचगणी पुन्हा लॉकडाऊन :शेखर सिंहमहाबळेश्वर शहर विकास आराखड्याबाबत आढावा बैठक; जाणून घेतल्या संकल्पना

महाबळेश्वर : कोरोना सध्या नियंत्रणात आहे. परंतु गर्दीमुळे पुन्हा जर प्रादुर्भाव वाढला तर महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटनस्थळांना पुन्हा लॉकडाऊन जाहीर करावा लागले, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला.महाबळेश्वर येथे महाबळेश्वर शहर विकास आराखडा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, पर्यवेक्षाधीन अधिकारी मनीषा आव्हाळे, तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, मुख्याधिकारी पल्लवी पाटील उपस्थित होते़महाबळेश्वरचा विकास आराखड्यावर काम सुरू झाले आहे, तेव्हा काही सूचना असतील तर सांगण्याची विनंती जिल्हाधिकारी सिंह यांनी बैठकीत केली. यावर ह्यवेण्णालेक येथे सायंकाळनंतर शुकशुकाट पसरतो. याठिकाणी लेझर शो सुरू करण्यात आला. तर येथील व्यावसायिकांना रात्री नऊपर्यंत व्यवसाय मिळेल. वेण्णालेक येथील पूल बांधून बायपास सुरू करावा. टोल नाक्याच्या जागेवरून पालिका व वन विभाग यांच्यात वाद सुरू आहे. याप्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणीही कुमार शिंदे यांनी केली.नगरसेवक युसूफ शेख यांनी पाचगणी, दांडेघर टोल नाक्यावर महाबळेश्वरचा टोलही जबरदस्तीने वसूल केला जातो. याकडे लक्ष वेधले. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील यांनी महाबळेश्वरचे पॉईंट पर्यटकांसाठी खुले करण्याची मागणी केली. तसेच याचा पाठपुरावाही सुरू ठेवला.येथील घोडे व्यावसायिक, टॅक्सी संघटना, व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांनीही मागणी केली होती. आता दिवाळी हंगाम सुरू होत आहे. या बाबी लक्षात घेऊन दोन दिवसांत पॉईंट सुरू करण्यास परवाणगी देणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, ह्यमहाबळेश्वर येथे पर्यटन वाढीपेक्षा पर्यटकांना सोयी सुविधा मिळतात. त्याच्या दर्जामध्ये वाढ करण्याची गरज आहे. महाबळेश्वर येथे आल्यानंतर पर्यटकांचा बराच वेळ टोलनाक्यावर जातो. वाहतूक कोंडी होते म्हणून पर्यटकांना ऑनलाईन टोल भरण्याची सुविधा पालिकेने सुरू करावी.

वेण्णालेक येथे पालिकेबरोबरच वन विभागाचाही टोल वसूल करतात. एकाच ठिकाणी दोन विभागांची टोल वसुली कशी होते. पॉईंटवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पुरेसे संरक्षक कठडे असले पाहिजे. स्वच्छतागृह, प्रकाश व्यवस्था, बैठक व्यवस्था, वाहनतळ जागा पॉईंटचे फलक, माहिती फलक असावे, खासगी बससाठी वाहनतळ मिळावे, आदी मागण्या नगरसेवकांनी केल्या. चर्चेत नगरसेवक किसनराव शिंदे, प्रकाश पाटील, विमल पार्टे यांनी सहभाग घेतला. 

टॅग्स :Mahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानSatara areaसातारा परिसरCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकPanchgani Hill Stationपाचगणी गिरीस्थान