Satara: फार्महाऊस फोडले; टीव्ही, फ्रीज, पंखे, नळही चोरले
By दीपक शिंदे | Updated: February 24, 2024 13:14 IST2024-02-24T13:12:53+5:302024-02-24T13:14:07+5:30
सातारा : सातारा शहराजवळील खिंडवाडी येथील एका फार्महाऊसमध्ये अज्ञाताने चोरी केली. यामध्ये रोख रक्कम, टीव्ही, फ्रीज, सिलींडरसह अन्य साहित्य ...

Satara: फार्महाऊस फोडले; टीव्ही, फ्रीज, पंखे, नळही चोरले
सातारा : सातारा शहराजवळील खिंडवाडी येथील एका फार्महाऊसमध्ये अज्ञाताने चोरी केली. यामध्ये रोख रक्कम, टीव्ही, फ्रीज, सिलींडरसह अन्य साहित्य लंपास करण्यात आले. तर या चोरीत सुमारे ६५ हजारांचा ऐवज नेण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सुनील काशीनाथ बंडगर (रा. कोडोली, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार दि. १९ ते २० फेब्रुवारीदरम्यान घरफोडी झाली आहे. अज्ञात चोरट्याने फार्महाऊसमधील राहत्या घराचे कुलूप तोडून चोरी केली. घरातून दोन टीव्ही, फ्रीज, आठ पंखे, गॅस सिलिंडर टाक्या दोन, एक मूर्ती, आंघोळीच्या खोलीतील नळ, शाॅवर त्याचबरोबर लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडून ९ हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. या चोरीत ६४ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आलेला आहे.
सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. हवालदार गुरव हे तपास करीत आहेत.