श्रीराम बझारमधून १ लाख ३२ हजारांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:26 IST2021-06-19T04:26:12+5:302021-06-19T04:26:12+5:30

फलटण येथील श्रीराम बझारचे महात्मा फुले चौक शाखेच्या मागील बाजूस असलेले शटर उचकटून तब्बल १ लाख ३२ हजार रुपयांची ...

Theft of 1 lakh 32 thousand from Shriram Bazaar | श्रीराम बझारमधून १ लाख ३२ हजारांची चोरी

श्रीराम बझारमधून १ लाख ३२ हजारांची चोरी

फलटण

येथील श्रीराम बझारचे महात्मा फुले चौक शाखेच्या मागील बाजूस असलेले शटर उचकटून तब्बल १ लाख ३२ हजार रुपयांची चोरी झाली असून, त्यापैकी ५० हजार रुपयांची रोख रक्कम मिळून आले आहे. दरम्यान, या चोरीची तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले चौकातील श्रीराम बझारच्या मागील बाजूस असलेले शटर अज्ञात चोरट्यांनी १७ जून रोजी पहाटे ४. ३० ते १८ जून रोजी सकाळी ८.३० दरम्यान तोडले आणि तब्बल १,३२,२६६/- रुपये चोरून नेले असल्याची तक्रार व्यवस्थापक विनायक बाबूराव शिंदे रा. भडकमकरनगर, फलटण यांनी दिली आहे. दरम्यान, पोलीस पंचनामा करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी ५० हजार रुपये मिळून आले आहेत, या तक्रारीवरून त्या अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे, पोलीस निरीक्षक भरत किंद्रे यांनी भेट दिली. साताराहून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करीत आहेत.

Web Title: Theft of 1 lakh 32 thousand from Shriram Bazaar