साताऱ्यात कॉलेज परिसरामध्ये तरुणाचा नग्नावस्थेत धिंगाणा, अचानक घडलेल्या प्रकाराने सारेच अवाक्

By दत्ता यादव | Updated: August 26, 2022 14:43 IST2022-08-26T14:43:04+5:302022-08-26T14:43:42+5:30

त्याचे हे कृत्य पाहून अनेकांनी डोळ्यावर हात ठेवला तर काहींनी आपला मार्गच बदलला.

the young man nakedness in the college premises In Satara | साताऱ्यात कॉलेज परिसरामध्ये तरुणाचा नग्नावस्थेत धिंगाणा, अचानक घडलेल्या प्रकाराने सारेच अवाक्

साताऱ्यात कॉलेज परिसरामध्ये तरुणाचा नग्नावस्थेत धिंगाणा, अचानक घडलेल्या प्रकाराने सारेच अवाक्

सातारा : साताऱ्यातील सायन्स कॉलेज परिसरात एका तरुणाने चक्क नग्नावस्थेतच रस्त्यात बैठक मारली. त्याच्या या कृत्याने पादचाऱ्यांचे डोळे मात्र मोठे झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व त्या तरुणाला कपडे घालून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. गुरुवारी सकाळी घडलेल्या या प्रकाराने सारेच अवाक् झाले.

पोवई नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या सायन्स कॉलेज आवारात विद्यार्थी, पादचारी व विक्रेत्यांनी नेहमीच रेलचेल सुरू असते. गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एक तरुण नग्नावस्थेत सर्वत्र फिरू लागला. त्याचे हे कृत्य पाहून अनेकांनी डोळ्यावर हात ठेवला तर काहींनी आपला मार्गच बदलला. तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले असावे, असा कयास बांधून काही नागरिकांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.

पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व तरुणाला कपडे आहे. यानंतर त्याला उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणाच्या या विचित्रपणाची चर्चा नागरिकांमध्ये दिवसभर सुरू होती. दरम्यान, संबंधित तरुण हा एका कंंपनीत कामाला असून, उंब्रज (ता. कऱ्हाड) परिसरातील तो रहिवासी आहे. उपचारानंतर त्याला नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: the young man nakedness in the college premises In Satara