शहरं
Join us  
Trending Stories
1
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
2
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
3
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
4
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
5
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
6
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
7
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
8
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
9
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
10
प्रेमाच्या नादात दोन मुलांच्या आईचं 'कांड', पतीला दिला धोका; बहिणीचा संसार, सुरू होण्याआधीच मोडला!
11
Travel : पुतिन यांच्या रशियात फिरायला जायचा विचार करताय? किती खर्च येईल आणि कुठे कुठे फिराल? जाणून घ्या..
12
“महायुती सरकार बौद्धिक, आर्थिक दिवाळखोरीत; शेतकरी, लाडक्या बहिणींना फसवले”: हर्षवर्धन सपकाळ
13
30 दिवस, 14000 उड्डाणे रद्द, Indigo अडचणीत येण्याचे काय कारण? परिस्थिती कधी सुधारेल?
14
भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट नाकारला? जैन, मारवाडी, ब्राह्मण असाल तरच घर; बिल्डर लॉबीचा मनमानी कारभार
15
२००० मंत्र, २०० वर्ष असाध्य; १९ वर्षीय देवव्रतने ५० दिवसात केलेले दंडक्रम पारायण नेमके काय?
16
मोबाईलच्या चार्जरमुळे मुलाला लागला शॉक; तुमच्यासोबतही घडू शकते दुर्घटना! 'या' चुका आधीच टाळा
17
FD पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या 'या' ३ सरकारी योजना: तुमचे भविष्य होईल सुरक्षित, टॅक्समध्येही मोठी सूट!
18
वैभव सूर्यवंशीने केली अर्जुन तेंडुलकरची जोरदार धुलाई, ४ चौकार-४ षटकारांंसह ठोकले ४६ धावा
19
Video - "राहुल गांधींनी भाजपामध्ये सामील व्हावं, देवाने तुम्हाला..."; कंगना राणौतचा खोचक सल्ला
20
पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये काय चर्चा झाली? पुतिन यांनी सांगितला चीनमधील 'तो' किस्सा...
Daily Top 2Weekly Top 5

Pune-Bangalore Highway: उड्डाणपुलाशेजारी घोंगावतेय मृत्यूचे सावट, सुरक्षिततेचे उपाय नसल्याने अपघातांत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 18:24 IST

जुन्या उड्डाणपुलांच्या रुंदीकरणाचे काम धोक्याचे

माणिक डोंगरेमलकापूर : मलकापूर परिसरातील पुणे-बंगळुरू महामार्गाच्या जुन्या उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम ठिकठिकाणी धोकादायक बनले आहे. याठिकाणी भक्कम सुरक्षितता नसल्यामुळे अपघातांत वाढ झाली आहे. रुंदीकरणाचे काम सुरू असलेल्या उड्डाणपुलाशेजारी क्षणाक्षणाला मृत्यू घोंगावत आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराविरोधात वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.पुणे-बंगळुरू महामार्गाच्या सहापदरीकरण कामात शेंद्रे ते कागल हे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. या कामात ४१ ठिकाणी लहान अंडरपास, मलकापुरात १ तीन किलोमीटरचा युनिक उड्डाणपूल तर १ पादचारी पूल, ५३ ठिकाणी बॉक्स कलव्हर्ट, १०६ ठिकाणी पाईप कलव्हर्ट, ३० ठिकाणी स्लॅब कलव्हर्ट, १०५ ठिकाणी उपमार्ग कलव्हर्ट, वाठार, पाचवड, वारुंजी फाटा, पंढरपूर फाटा हे ४ ग्रेड जंक्शन, ३४ विविध ठिकाणी मायनर जंक्शन, २४ ठिकाणी बस स्टॉप, ९ ठिकाणी मोठे अंडरपास, ४ ठिकाणी लहान अंडरपास, २४ ठिकाणी उपमार्ग पूल होणार आहेत.या सर्व ठिकाणी संबंधित कंत्राटदाराने कामे सुरू केली आहेत. मात्र, बहुतांश ठिकाणी सुरक्षिततेबाबत पुरेशी व्यवस्था केलेली नसल्यामुळे महामार्गावर अपघातांत वाढ झाली आहे.मंगळवारी सहलीच्या बसला झालेल्या अपघातात ५७ जण जखमी झाले. त्याच पद्धतीने काही दिवसांपूर्वी वाठार येथेच मालवाहतूक रिक्षा पुलावरून नदीत कोसळून अपघात झाला होता. तर वाठार ते टोल नाका परिसरात खोदलेल्या खड्ड्याला पुरेशी सुरक्षितता नसल्यामुळे अनेक अपघात होऊन २० जणांना आपला जीव गमवावा लागला तर १०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.याबाबत अनेकवेळा आंदोलने करूनही महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. अशा ठिकाणी सुरक्षिततेबाबत पुरेशी उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र, सुरक्षिततेबाबत कोणतीही काळजी घेतली नसल्याने वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांमधून कंत्राटदाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सात ठिकाणी भरावपुलांच्या रुंदीकरणाला ठोकळ्यांचा आधारतासवडे ते पेठ नाका परिसरात प्रत्येक गावाच्या समोर सात ठिकाणी भरावपूल आहेत. महामार्गाच्या रुंदीकरणासाठी या सातही भरावपुलांचे रुंदीकरण करावे लागणार आहे. हे रुंदीकरण करत असताना दोन्ही बाजूला भिंत बांधून मध्ये भराव घालण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, जुना भराव आणि नवीन भिंत याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सुमारे २० ते २५ फुटाचे खड्डे आहेत. याठिकाणी एकेरी वाहतुकीत केवळ ठोकळ्यांचा आधार ठेवलेला आहे. या खड्ड्यांना सुरक्षिततेची कोणतेही प्रभावी उपाययोजना केलेली नाही.

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडतीवाठार (ता. कराड) येथे सहलीच्या बसला झालेल्या अपघाताची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तातडीने दखल घेतली. महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसह संबंधित कंत्राटदाराच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन, महामार्गावर होणाऱ्या अपघातांबाबत जाब विचारला. संबंधित अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांची चांगलीच झाडझडती घेतली, याची मलकापुरात महामार्गाचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune-Bangalore Highway Construction: Safety Lapses Cause Accidents, Claim Lives

Web Summary : Highway construction near Malakapur lacks safety measures, causing accidents. Numerous injuries and fatalities have occurred due to inadequate precautions at underpasses and diversions. Public outrage grows over contractor negligence despite repeated appeals for safety improvements. Minister intervenes after bus accident.