Satara News: वाई-पाचगणी रस्त्यावर 'बर्निंग कार'चा थरार, ..अन् जिवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 17:13 IST2023-02-13T17:12:20+5:302023-02-13T17:13:14+5:30
दिलीप पाडळे पाचगणी : वाई-पाचगणी रस्त्यावर दांडेघर ता. महाबळेश्वर गावच्या हद्दीत बर्निंग कार'चा थरार घडला. कार क्रमाक (एम.एच ...

Satara News: वाई-पाचगणी रस्त्यावर 'बर्निंग कार'चा थरार, ..अन् जिवितहानी टळली
दिलीप पाडळे
पाचगणी : वाई-पाचगणी रस्त्यावर दांडेघर ता. महाबळेश्वर गावच्या हद्दीत बर्निंग कार'चा थरार घडला. कार क्रमाक (एम.एच -०२-डब्लयु-६९९७)ने अचानक पेट घेतला. ते मुबईहून पर्यटनासाठी आले होते. कारने पेट घेताच चौघे तत्काळ गाडीतून बाहेर आले त्यामुळे जीवितहानी टळली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
रस्त्यावर आगीचा आगडोंब उसळला होता. घटनेची माहिती मिळताच पाचगणी पोलिस, नगरपरिषदेची अग्नीशमन दलाची गाडी तत्काळ दाखल घटनास्थळी झाली. अग्नीशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. मात्र तोपर्यंत अर्धी कार जळून खाक झाली. आगीमुळे कार मालकाचे मोठे नुकसान झाले. आगीच्या या घटनेमुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
कारमधील तिघे वयोवृद्ध
हरीश मजवानी यांची ही कार होती. कारमधील तिघे वयोवृद्ध होते. सुदैवाने सर्व जण सुखरुप आहेत.