शिक्षकाचे कुटूंब बाहेर गेले; भरदिवसा घर फोडून दहा लाखांवर डल्ला

By नितीन काळेल | Published: March 15, 2024 01:55 PM2024-03-15T13:55:58+5:302024-03-15T13:56:05+5:30

अज्ञातावर गुन्हा : पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू; सोन्याचे दागिने लंपास

The teacher's family moved out; Break into a house in broad daylight and steal over ten lakhs | शिक्षकाचे कुटूंब बाहेर गेले; भरदिवसा घर फोडून दहा लाखांवर डल्ला

शिक्षकाचे कुटूंब बाहेर गेले; भरदिवसा घर फोडून दहा लाखांवर डल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहराजवळील खेड येथे घरात कोणी नसल्याचा फायदा घेत भरदविसा कडी तोडून १० लाखांहून अधिक किंमतीचा एेवज लंपास करण्यात आला. यामध्ये सोन्याचे २९ तोळे दागिने, रोख रकमेचा समावेश आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा नोंद झाला आहे. तर पोलिसांनी विविध पातळीवर चोरट्याचा शोध सुरू केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी बापूराव बाबूराव सोनवलर (रा. खेड, सातारा. मूळ रा. भाडळी खुर्द, ता. फलटण) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार दि. १३ मार्च रोजी सकाळी साडे आकरा ते सायंकाळी साडे पाच वाजेच्या दरम्यान चोरीचा हा प्रकार घडला. तक्रारदार हे शिक्षक असून ते व त्यांच्या कुटुंबातील सर्वजण बाहेर गेले होते. यादरम्यान, अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरुममधील लाकडी कपाटाच्या ड्रावरमधील सोन्याचे २९ तोळे आणि ६ ग्रॅम वजनाचे दागिने चोरले. तसेच यावेळी चोरट्यांच्या हाती रोख रक्कमही लागली. या चोरीनंतर संशियतांनी पलायन केले. सायंकाळी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली.

या घटनेत ९ लाख २९ हजार ५०० रुपयांचा एेवज चोरीस गेला असल्याचे तक्रारीत स्पष्ट केले आहे. तरीही आजच्या भावानुसार सोन्याचा दर अधिक आहे. त्यामुळे या चोरीत १० लाखांहून अधिक रकमेचा एेवज लंपास झाला आहे. याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक जाधव हे तपास करीत आहेत.

सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार...
ही चोरी दिवसा झाली आहे. जवळपास कोणी नसल्याचे पाहून हा प्रकार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आलेले आहे. पोलिसांनी आता सीसीटीव्हीचे फुटेज मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामाध्यमातून चोरट्याचा शोध घेतला जात आहे. तसेच पोलिसांनी विविध पातळीवरही चोरट्याचा तपास सुरू केलेला आहे.

Web Title: The teacher's family moved out; Break into a house in broad daylight and steal over ten lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.