शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक इमारतीत घडतंय विद्यार्थ्यांचे भवितव्य, जिल्हा परिषदेत निर्लेखन प्रस्ताव अडकला लाल फितीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 16:43 IST

तुटलेल्या खांबावर उभ्या असलेल्या इमारतीच्या छताखाली शिक्षणाचे जीवघेणे धडे गिरवले जात आहेत.

दशरद ननावरेखंडाळा : शिक्षण हा बालकांचा हक्क आहे. प्राथमिक शिक्षण सर्वांना मिळावे, यासाठी गावोगावी खेडोपाड्यात शाळा बांधण्यात आल्या आहेत. मात्र, खंडाळा तालुक्यातील अंदोरी येथील ननावरेमळा वस्तीवरील शाळेची इमारत धोकादायक असताना त्याच इमारतीखाली मुलांचे शिक्षण सुरू आहे. त्यामुळे मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. यावर जिल्हा परिषदेने तातडीने उपाययोजना करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.ननावरेमळा शाळेत पहिली ते चौथीचे प्राथमिक वर्ग आहेत. दोन वर्गखोल्या असलेल्या या शाळेत सुमारे ३० ते ४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, येथील दोन्ही वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे. तुटलेल्या खांबावर उभ्या असलेल्या इमारतीच्या छताखाली शिक्षणाचे जीवघेणे धडे गिरवले जात आहेत. या दोन्ही इमारती धोकादायक असल्याने शाळेने त्या पाडण्यासाठी निर्लेखन प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविला आहे. मात्र, सहा महिन्यानंतरही अद्याप यावर कोणताही निर्णय झाला नाही.त्यामुळे याच वर्गखोल्यातून मुलांचे शिक्षण सुरू आहे. वास्तविक, शाळेच्या चारही भिंती खराब झाल्या आहेत. फरशी उखडली आहे. इमारतीचे छताचे तुकडे पडत आहेत तर इमारतीचे खांब निकामी झाल्याने केवळ सळईचा आधार उरला आहे. अशा स्थितीत मुलांच्या जीविताचा विचार करून खोल्या पाडणे गरजेचे आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

शाळेच्या दोन्ही खोल्या धोकादायक आहेत. त्या तातडीने पाडल्या पाहिजेत. नवीन वर्गखोल्या बांधेपर्यंत मुलांची इतरत्र सोय करण्यास आम्ही तयार आहोत. मात्र, प्रशासनाने निर्लेखन प्रस्तावास मंजुरी देणे गरजेचे आहे. तसेच नवीन खोल्या बांधणे आवश्यक आहे. - नामदेव ननावरे, अध्यक्ष शाळा समिती

वर्ग : पहिली ते चौथीखोल्या : २विद्यार्थी : ३२

टॅग्स :Satara areaसातारा परिसरStudentविद्यार्थीSchoolशाळाzpजिल्हा परिषद