Satara: सज्जनगडाच्या बुरुजावर कायमस्वरूपी फडकणार भगवा ध्वज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 16:48 IST2025-05-16T16:47:47+5:302025-05-16T16:48:12+5:30

‘दुर्गनाद प्रतिष्ठान’चा छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उपक्रम

The saffron flag will fly permanently on the bastion of Sajjangad Satara | Satara: सज्जनगडाच्या बुरुजावर कायमस्वरूपी फडकणार भगवा ध्वज!

Satara: सज्जनगडाच्या बुरुजावर कायमस्वरूपी फडकणार भगवा ध्वज!

परळी : येथील किल्ले सज्जनगडाच्या बुरुजावर छत्रपती संभाजी महाराजांचा जयजयकार अन् समर्थ नामाचा जयघोष करीत बुरुजावर भगवा ध्वज उभारण्यात आला.

सज्जनगडावर ‘दुर्गनाद प्रतिष्ठान’च्या दुर्गसंवर्धकांनी दि. १४ रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त धाब्याच्या मारुतीजवळील बुरुजावरती कायमस्वरूपी भगवा ध्वज स्थापित केला. छत्रपती संभाजीराजांच्या चरणी अर्पित केला. छत्रपती संभाजी महाराज हे काही काळ सज्जनगडावरती वास्तव्यास होते. समर्थ रामदास स्वामी यांनी समाधी घेतल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी श्रीराम मंदिर व त्याच्या खालच्या बाजूला असलेले रामदास स्वामी समाधी मंदिर उभारल्याची इतिहासात नोंद आहे. 

त्यांच्या जयंतीनिमित्त धाब्याच्या मारुतीजवळील बुरुजावर ‘दुर्गनाद प्रतिष्ठान’च्या दुर्ग संवर्धकांनी त्या परिसरामध्ये भगवा ध्वज लावण्यासाठी प्रयत्न केला; परंतु काही दुर्गसंवर्धकांना मधमाशा चावल्याने दुपारी मोहीम स्थगित करून पुन्हा रात्री ध्वज स्थापित करण्यात आला; तसेच आज दि. १४ रोजी सज्जनगड कायमस्वरूपी भगवा ध्वज स्थापित करण्यासाठी रामदास स्वामी संस्थांचे विश्वस्त अधिकारी स्वामी भूषण स्वामी सु. ग. स्वामी समर्थ रामदास स्वामी संस्थानचे कार्यवाहक रोकडे बुवा, ग्रामपंचायत परळी, यांनी सहकार्य केले.

दुर्गसंवर्धक, कार्यवाहक रोकडे बुवा यांनी झेंड्याचे पूजन करून भगवा झेंडा फडकवला. समर्थ रामदास स्वामी समाधी मंदिर परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रेरणामंत्र आणि ध्येयमंत्रासह शंभू महाराजांच्या प्रतिमेला त्रिवार मानाचा मुजरा करण्यात आली.

Web Title: The saffron flag will fly permanently on the bastion of Sajjangad Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.