शहरं
Join us  
Trending Stories
1
बुरहान वानीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दिल्ली बॉम्बस्फोट घडवला? डॉ. उमर बद्दल मोठा खुलासा...
2
T20 World Cup 2026 Schedule Announced : टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाक एकाच गटात
3
खडसे-महाजन वादात माझा सँडविच होतोय; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचे मोठे विधान
4
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर CM फडणवीसांचे भाष्य; म्हणाले, “निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया...”
5
Video: धक्कादायक! माजी आमदार निर्मला गावित यांना अज्ञात कारने उडवले, रुग्णालयात दाखल
6
कुटुंबियांचा लग्नास विरोध; पाकिस्तानी हिंदू प्रेमी युगुल सीमा ओलांडून भारतात, BSF ने घेतले ताब्यात
7
“जोपर्यंत CM आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”; फडणवीसांनी दिला शब्द
8
बिहार फत्ते; आता 'या' दोन राज्यात NDA चे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा मोठा दावा...
9
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
10
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
11
'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पुण्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
12
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
13
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
14
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
15
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
16
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
17
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
18
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
19
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
20
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
Daily Top 2Weekly Top 5

TET paper leak case: प्रयत्न कोल्हापुरात; खळबळ कराडात!, ‘महेश’च्या लाईफस्टाइलची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 15:42 IST

सूत्रधार कराडचा, एक सेवानिवृत्त जवान

कराड : कोल्हापुरात रविवारी टीईटी परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला; पण पर्दाफाश केलेल्या या रॅकेटचे सूत्रधार कराड तालुक्यातील बेलवाडी गावच्या जय हनुमान करिअर अकॅडमीचे दोन संचालक असल्याचे समोर आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.राज्यात विविध केंद्रांवर रविवार, दि. २३ रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. मात्र, आदल्या दिवशीच पेपर फोडण्याचा प्रयत्न झाला. कोल्हापूर एलसीबी आणि मुरगूड पोलिसांनी संयुक्त कारवाईद्वारे या रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांच्या पथकांनी मुरगूड-निपाणी रस्त्यावर सोनगे (ता. कागल) येथील एका मॉलवर मध्यरात्री छापा टाकून या रॅकेटमधील १० जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये चार शिक्षकांचा समावेश आहे. पण, या रॅकेटचा सूत्रधार कराड तालुक्यातील अन् शिक्षण क्षेत्राशी निगडित असल्याने शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.यातील मुख्य सूत्रधार महेश भगवान गायकवाड (रा. बेलवाडी, ता. कराड) हा सध्या फरार असून, त्याचा भाऊ संदीप गायकवाड हा अटकेत आहे. तो सेवानिवृत्त जवान आहे. बेलवाडी गावात त्यांची जय हनुमान करिअर अकॅडमी आहे. त्याठिकाणी मुले भरती पूर्व प्रशिक्षण घेतात. हे दोन्ही भाऊ अकॅडमीचे संचालक आहेत. त्यांचा थोरला भाऊ प्रमोद गायकवाड हा अकॅडमीचे व्यवस्थापन सांभाळतो. यावर्षी त्यांनी कनिष्ठ महाविद्यालयही सुरू केले असून, तेथे विद्यार्थ्यांची निवासी सोय करण्यात आली आहे.

करिअर घडविणाऱ्यांचेच करिअर अडचणीत!जय हनुमान करिअर अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्याचे काम येथे केले जात होते; पण दोन संचालक बंधूंच्या प्रतापामुळे संपूर्ण कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचबरोबर एक भाऊ प्रमोद गायकवाड हा आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मसूर जिल्हा परिषद गटातून राजकीय करिअर करण्याच्या तयारीत होता; पण आता त्याचे करिअरच अडचणीत आल्याची चर्चा आहे.

‘महेश’च्या लाईफस्टाइलची चर्चामहेश गायकवाड हा मसूर परिसरात नेहमीच वावरायचा. त्याच्याबाबत अधिक माहिती घेतल्यावर त्याच्या लाईफस्टाइलची परिसरात चर्चा ऐकायला मिळते. तो अंगावर भरपूर सोने घालून फिरतो. तसे फोटोही पाहायला मिळतात. तोच पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या रॅकेटचा सूत्रधार निघाला आहे. या रॅकेटने यापूर्वीही पेपर फोडले आहेत का? हे तपासात निष्पन्न होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : TET Paper Leak: Attempt in Kolhapur, Stir in Karad!

Web Summary : TET paper leak attempt in Kolhapur leads to Karad. Academy directors are suspects. Mahesh's lifestyle is under scrutiny. Investigation ongoing.