शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बँकेत घुसून व्यवस्थापकाच्या डोक्यात कोयत्याने वार, कऱ्हाडातील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 12:45 IST

संशयिताने कर्जासाठी केला होता अर्ज; हल्ल्यात व्यवस्थापक गंभीर

कऱ्हाड : शेळीपालन कर्जाबाबत माहिती विचारण्यासाठी बँकेत आलेल्या युवकाने बँक व्यवस्थापकाच्या डोक्यात कोयत्याने वार केले. येथील भेदा चौकानजीक असलेल्या इंडियन ओवरसीज बँकेच्या शाखेत बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरा दाखल झालेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत अटक केली आहे.दरम्यान, संशयित युवकाने मानेच्या दिशेने केलेला कोयत्याचा वार बँक व्यवस्थापकाने हातावर झेलल्याने मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यात व्यवस्थापकांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आशिष जी कश्यप (वय ४४, सध्या रा. बनपुरी कॉलनी, कऱ्हाड, मूळ रा. बाकीपूर पाटणा, बिहार) असे जखमी बँक व्यवस्थापकाचे नाव आहे. याप्रकरणी आशितोष दिलीप सातपुते (रा. रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड) याच्याविरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडियन ओवरसीज बँकेची कऱ्हाडातील भेदा चौकानजीक शाखा आहे. या शाखेत आशिष कश्यप हे जुलै २०२४ पासून व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. रेठरे बुद्रुक येथील उज्ज्वला सातपुते यांनी शेळी पालनासाठी कर्ज मिळावे, यासाठी ओवरसीज बँकेच्या शाखेकडे अर्ज केला होता. या कर्ज प्रकरणाबाबत माहिती घेण्यासाठी उज्ज्वला सातपुते व त्यांच्यासोबत प्रदीप कांबळे हे दोघे तीन दिवसांपूर्वी बँकेत आले होते. त्यावेळी व्यवस्थापक आशिष कश्यप यांनी त्या दोघांना कर्ज प्रकरणाबाबतची सर्व माहिती दिली. त्यानंतर उज्ज्वला सातपुते यांचा मुलगा आशितोष हा याच कर्ज प्रकरणाची माहिती घेण्यासाठी बुधवारी बँकेत आला होता. त्यावेळी कश्यप यांनी त्याला कर्ज प्रकरणाची सर्व माहिती आईला दिली असून, तुम्ही अर्जदार नसल्याने मी तुम्हाला माहिती देऊ शकत नाही, असे सांगितले.काही वेळाने चिडून जात आशितोष याने कश्यप यांच्यावर अचानकपणे कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यावेळी कोयत्याचे दोन वार कश्यप यांच्या डोक्यावर लागले आहेत. तर अन्य दोन वार मानेच्या दिशेने करण्यात आले होते. मात्र, कश्यप यांनी वेळीच हात मध्ये घातल्याने ते बचावले. या घटनेनंतर संशयित आरोपी तेथून निघून गेला. तसेच बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कश्यप यांनी रुग्णालयात दाखल करून घटनेची माहिती कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली आहे.

शर्टातून लपवून आणला कोयता..संशयित आरोपी आशितोष याने बँकेत येतानाच शर्टात लपवून कोयता आणला होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. हल्ल्यावेळी बँकेतील अन्य कर्मचारी कश्यप यांच्या मदतीला धावले. याचवेळी कश्यप यांनी स्वत:ला जुन्या रेकॉर्ड असलेल्या खोलीत कोंडून घेतल्याने ते बचावले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbankबँकKaradकराडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस