शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

सातारा पालिकेत पदासाठी ‘आधी मी की तू’चा संघर्ष; निवडी रखडल्या, ‘स्वीकृत’चा पेच कायम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 19:12 IST

शर्यतीत अनेक मातब्बर नावे असल्याने कोणाला झुकते माप द्यायचे, यावरून पेच

सातारा : राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सातारा नगरपालिकेत सध्या ‘स्वीकृत’ नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष निवडीचा पेच अधिकच गडद झाला आहे. निवडणुकीचा निकाल लागून आता २५ दिवसांचा कालावधी उलटला तरी या निवडींना अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. ‘आधी मी की तू’ या अंतर्गत वादात निवडीचे घोडे अडकल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.सातारा नगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या ५० इतकी आहे. संख्याबळानुसार पाच स्वीकृत नगरसेवकांना पालिकेत काम करण्याची संधी मिळणार आहे. निवडणुकीच्या वेळी दोन्ही राजेंनी अनेक बंडखोरांची समजूत काढताना त्यांना पुढील काळात मोठी संधी देण्याचे आश्वासन दिले होते. आता ते आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आली असल्याने इच्छुकांची मोठी रांग लागली आहे.या शर्यतीत अनेक मातब्बर नावे असल्याने कोणाला झुकते माप द्यायचे, यावरून पेच निर्माण झाला आहे. जोपर्यंत या निवडी होत नाहीत, तोपर्यंत स्थायी समितीची स्थापना आणि पर्यायाने पालिकेच्या कामांना गती मिळणार नाही.

अनुभवाच्या शिदोरीवरच उपनगराध्यक्ष निवड?१. पालिकेत निवडून आलेल्या ५० नगरसेवकांपैकी बहुतांश नगरसेवक हे नवीन आहेत. प्रशासकीय कामाचा अनुभव नसलेल्या या नवख्या फौजेला सोबत घेऊन पालिकेचा गाडा हाकणे नगराध्यक्षांसाठी आव्हानात्मक ठरू शकते.२. त्यामुळेच उपनगराध्यक्षपदी एखाद्या अनुभवी आणि जुन्या जाणत्या नगरसेवकालाच संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे पद खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाकडे जाणार असून, सध्या मनोज शेंडे आणि दत्ता बनकर यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र, ऐनवेळी एखादा धक्कादायक चेहरा समोर येतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

दुधाची तहान ताकावर भागणार?नगरपालिका निवडणुकीच्या वेळी तिकीट कापले गेल्यामुळे अनेक जण नाराज झाले होते. त्यावेळी पक्षांतर्गत बंडाळी रोखण्यासाठी नेत्यांकडून ‘पुनर्वसन’ करण्याचे आश्वासन देण्यात आले. आता स्वीकृत नगरसेवक पदाच्या निमित्ताने ही संधी उपलब्ध झाली आहे. मात्र, उपलब्ध पदे पाच आणि इच्छुकांची संख्या डझनभर, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्या निष्ठावंतांना न्याय द्यायचा की भविष्यातील गणिते पाहून नव्यांना संधी द्यायची, या कात्रीत दोन्ही गटांचे नेतृत्व अडकले आहे. यामुळेच निवडीची प्रक्रिया लांबणीवर पडत असल्याचे बोलले जात आहे. ज्यांना संधी मिळेल, त्यांना दुधाची तहान ताकावर भागवावी लागणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Municipality: 'Me First' Conflict Delays Appointments, Accepted Councillor Impasse

Web Summary : Satara Municipality faces delays in appointing accepted councillors and deputy mayor due to internal conflicts. With limited positions and many contenders, fulfilling promises made during elections is proving difficult, stalling key committee formations.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले