राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पाडणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र

By दीपक शिंदे | Published: November 11, 2022 07:45 PM2022-11-11T19:45:45+5:302022-11-11T19:55:36+5:30

त्याच्या ताब्यात कुणी आले तर सहजासहजी सोडत नाही

The country knows the hypocrite who cast spells on Uddhav Thackeray. BJP state president Chandrashekhar Bawankule criticism of Sharad Pawar | राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पाडणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र

राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पाडणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र

Next

सातारा : ‘भाजप-सेना युती असतानाही राष्ट्रवादीने बेईमानीतून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा करून त्यांना आपल्याकडे वळवले. त्यांच्यावर ज्याने जादूटोणा केला तो भोंदू संपूर्ण देशाला माहीत आहे. त्याच्या ताब्यात कुणी आले तर सहजासहजी सोडत नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला.

सातारा येथील पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार फटकेबाजी केली. जयंत पाटील यांच्या महाविकास आघाडीचा काळ येणार असल्याच्या वक्तव्याचा समाचार घेताना बावनकुळे म्हणाले, ‘ते अजून स्वप्नात आहेत. त्यांनी स्वप्ने पाहणे सोडून द्यावे.’

खासदार सुप्रिया सुळे यांनी सीतारामन यांना दिलेल्या आव्हानाबाबत बावनकुळे म्हणाले, ‘बारामतीचा विकास म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास नव्हे. आठ वर्षांत सुप्रिया सुळे यांनी मतदार संघातील गावांचा घरोघरी दौरा केला नाही. आम्ही तीन महिन्यांत दौरा केला. राष्ट्रवादीचे घड्याळ बारामतीत बंद पाडणार आहे, त्यादृष्टीने आम्ही काम सुरू केले आहे.’

सातारा जिल्ह्यात दोन आमदार आहेत. त्यांना मंत्रिपदाचा शब्द फडणवीस यांनी दिला होता. याबाबत छेडले असता, बावनकुळे यांनी मी आजच मुख्यमंत्री शिंदे यांना याबाबत फोन करून हा निरोप पोहोच करेन.

ईडीबाबत ठाकरे यांच्याकडून भाजपवर आरोप होत असल्याबाबत बावनकुळे म्हणाले, ‘अडीच वर्षांत राज्यातील सीआयडी, अँन्टीकरप्शन आदी तपास यंत्रणा तुमच्याकडे होत्या. मग का गप्प बसला. सत्ता गेल्यावर प्रसिद्धीसाठी आरोप करण्यात येत आहेत. सरकारकडून भाजपच्या नेत्यांवर कारवाई होत नाही म्हणता तर सोमय्या यांनी कोर्टाचा आदेश आणला तसा तुम्ही आणा, असे आव्हान त्यांनी दिले. उद्धव ठाकरे यांनी तर काँग्रेसचे संविधान स्वीकारायचे बाकी आहे. असेही ते म्हणाले.’

अजित पवार यांचा फोन स्वीच ऑफ आहे. ते संपर्कात आहेत का? यावर बावनकुळे म्हणाले, अजित पवार काय करतील, हे त्यांनाच माहीत असते. ते भाजपला कसे ठाऊक असेल.

नगरपालिका निवडणूक भाजपच्याच चिन्हावर

सातारा नगरपालिका निवडणुकीबाबत पक्षाची शिस्त पाळली नाही तर पक्ष काय भूमिका घेणार? या प्रश्नावर बावनकुळे यांनी ‘भाजपच्याच चिन्हावर सातारा पाालिकेची निवडणूक लढविली जाईल व नगराध्यक्ष भाजपचाच असेल. दोन्ही राजेंनी एकत्र येण्यासाठी देवेंद्र फडणवीस तसेच आपण स्वत: प्रयत्न करू,’ असे सांगितले.

Web Title: The country knows the hypocrite who cast spells on Uddhav Thackeray. BJP state president Chandrashekhar Bawankule criticism of Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.