Satara News: आरटीओ पथकास चुकवून कार चालक सुसाट, पाठलाग करुन पकडून चालकास केला दोन लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 05:21 PM2023-03-18T17:21:26+5:302023-03-18T17:21:51+5:30

वाहन चालविण्याचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द

the car driver escaped after avoiding the RTO team In Mahabaleshwar Satara, The driver was fined two lakhs | Satara News: आरटीओ पथकास चुकवून कार चालक सुसाट, पाठलाग करुन पकडून चालकास केला दोन लाखांचा दंड

Satara News: आरटीओ पथकास चुकवून कार चालक सुसाट, पाठलाग करुन पकडून चालकास केला दोन लाखांचा दंड

googlenewsNext

अजित जाधव

महाबळेश्वर : आरटीओ पथकास चुकवण्यासाठी महाबळेश्वरमधील गल्लीबोळातून सुसाट कार पळविण्याऱ्या एकास ताब्यात घेतले. याप्रकरणी संबंधित कारचालक अजमुद्दीन वलगे याला १ लाख ९० हजार रुपयांचा दंड केला. तसेच वाहन चालविण्याचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द केला. ही कारवाई आज, शनिवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी वाहतूक निरीक्षक आफरी मुलाणी यांनी केली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांचे फिरतेपथक महाबळेश्वरमध्ये दाखल झाले आहे. हे पथक दर महिन्याला शहर व तालुक्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा वाहन कर, वाहन परवाना, वाहन नोंदणी, वाहन पासिंग अशी दर महिन्याला कागदपत्रे तपासणी करत असते. पर्यटनस्थळ असल्यामुळे तालुक्यात काळी पिवळी ट्रॅक्सी व टुरिस्ट ट्रॅक्सी जवळपास ८०० वाहने आहेत. यामध्ये कोणाच्या वाहनाचे कागदपत्रे अपुरे तर कोणी परवाना भरलेला नाही. याची आलेल्या अधिकाऱ्याकडे संपूर्ण कुंडली असल्याने शहरात आरटीओ आलेले कळताच वाहनचालक, मालक वाहने लपविण्याचा प्रयत्न करतात.

इराणी पेट्रोल पंपाजवळ आज, सकाळच्या सुमारास परिवहन विभागाचे वाहन पाहताच कार क्रमांक (एमएच ११ बीडी ८२८२) चालकाने पळ काढला. वाहतूक निरीक्षक आफरीन मुलाणी यांना संशय आल्यामुळे त्यांनी या कारचा पाठलाग केला. चालकाने शहराच्या गल्लीबोळातून कार पळविण्याचा प्रयत्न केला. यावेळी भरधाव कारने एका दुचाकीला धडक दिली. धडकेत कारचा पुढील टायर पंक्चर झाल्याने वेग कमी झाला. 

यावेळी पाठीमागून आलेल्या वाहतूक निरीक्षक आफरीन मुलाणी यांनी चालकास पकडले. त्याच्याकडे अधिक चौकशी करुन त्याला महाबळेश्वर आगारात नेले. तेव्हा कारचा सहा वर्षे वाहन कर थकीत होता. यामुळे चालकाला कारसह ताब्यात घेतले. वाहनाला तब्बल १ लाख ९० हजार रुपयांचे चलन दिले. तसेच कारचालकाचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द केला. वाहन जप्त करण्यात आले. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी वाहतूक उपनिरीक्षक तेजस्विनी गावडे उपस्थित होत्या.

Web Title: the car driver escaped after avoiding the RTO team In Mahabaleshwar Satara, The driver was fined two lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.